Home » सोलापूर » ५००, १००० च्या नोटा आणण्यासाठी महापालिकेचे ४०० कर्मचारी

५००, १००० च्या नोटा आणण्यासाठी महापालिकेचे ४०० कर्मचारी

= हाती घ्याल ते तडीस न्या! कर वसुलीसाठी आयुक्तांची निर्णायकी =
solapur-mahanagar-palika-smcविशेष प्रतिनिधी
सोलापूर, दि. १२ नोव्हेंबर –
चलनामधून बाद होणार्‍या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मनपा तिजोरीत कर रूपाने आणण्यासाठी आयुक्त वि.ना.काळम यांनीं हाती घ्याल ते तडीस न्या, असा निर्णायकी संकल्प केला असून पालिकेतील ४०० कर्मचारी कर वसुलसाठी मैदानात उतरले आहेत. १४ तारखेपर्यंत ही मोहीत फत्ते केली जाईल, असे काळम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
मिळकत कराबरोबरच, हद्दवाढ, गवसु, पाणीपट्टी, एलबीटी, पालिकेचे गाळाधारक, बांधकाम परवाना आदी ठिकाणाहून पालिकेसाठी मोठ्या प्रमाणात महसूल येण्याची खात्री आहे. संबंधित करधारकांकडे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा असून त्या चलनामधून बाद होण्यापूर्वीच करधारकांनी मनपा तिजोरीत जमा केली तर त्यांचेही हित आहे, शिवाय पालिकेला कररूपाने महसूल प्राप्त होईल, ही बाब निदर्शनास आणली. पालिकेतील ४०० कर्मचारी आणि अधिकारी या कामासाठी तैनात केले आहेतच, शिवाय उपायुक्त म्याकलवार, अभिजित हराळे, लक्ष्मण चलवादी, अवताडे आदी मंडळींचीही टीम सोबत आहे. शिवाय पोलीस बंदोबस्त दिला असून, कुठे बाका प्रसंग उद्भवला तर मला फोन करा, मी तिथे हजर राहून मार्ग काढणार आहे, असेही आयुक्त काळम म्हणाले.
उपमहापौर प्रवीण डाेंंगरे, सभागृहनेते संजय हेमगड्डी यांच्याशीही सल्लामसलत केली आहे. कर वसूल करताना बांधकाम परवाने नियमित करण्याची योजना आहे, पण तिथे काही अनुचित होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. पुढील वर्षीचा आगाऊ कर घेण्याबाबत सूचना आली आहे, पण शासनाचे तसे निर्देश नाहीत, त्यामुळे हे शक्य नाही. मिळकतकर, हद्दवाढ, गवसु, एलबीटी, गाळे भाडे वसुलीबाबत कोणी थकबाकीदार हयगय करीत असेल तर कसलाही मुलाहिजा न ठेवता थेट सील करण्याची कारवाई करा, असे निर्देशही धडक मोहिमेतील वसुली पथकाला दिले आहेत, याकडेही आयुक्त काळम यांनी लक्ष वेधले.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in सोलापूर (91 of 121 articles)


=‘महावितरण’चा असाही फंडा= =एकाच दिवशी ३.५० कोटींची भरणा= संगमेश जेऊरे [सोलापूर, दि. १२ नोव्हेंबर ] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...