Home » अर्थभारत » जिओकडून येणार एक हजारात फोन?

जिओकडून येणार एक हजारात फोन?

वृत्तसंस्था
मुंबई, १७ नोव्हेंबर
jio-4gअत्यंत अल्प किमतीत ४जी स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल केल्यानंतर आणखी एक ‘धक्कादायक’ फोन बाजारात आणण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे. ४जी तंत्रज्ञानयुक्त या फिचर फोनची किंमत किमान १ हजार रुपये राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याचबरोबर अमर्यादित व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही देण्यात येणार आहे. ग्रामीण आणि शहरी कनिष्ठ मध्यमवर्गीय नागरिकांना डोळ्यापुढे ठेवून हा फोन बाजारात आणण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीजवळ फोन असावा अशी कंपनीची इच्छा आहे. यासाठी व्हीओएलटीई तंत्रज्ञानयुक्त फिचर फोन दाखल करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर करणार्‍या व्यक्तींना डोळ्यापुढे ठेवून हा फोन बाजारात आणण्यात येणार आहे.
भारतात २जी फोनला अजूनही मागणी आहे, असे यासंबधित अधिकार्‍याने सांगितले. कंपनीकडून हा फोन जानेवारी ते मार्चदरम्यान दाखल करण्यात येईल. मात्र, हा फोन टचस्क्रीन असणार नाही. ५ सप्टेंबरपासून भारतीय बाजारात उतरलेल्या मुकेश अंबानी यांच्या या कंपनीचे सध्या २.५ कोटी ग्राहक आहेत. कमीत कमी वेळेत १० कोटी ग्राहक जोडण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या नव्या फोनसंबंधी अधिकृतपणे माहिती देण्यास कंपनीकडून नकार देण्यात आला आहे. सध्या ४जी व्हीओएलटीई तंत्रज्ञानयुक्त स्मार्टफोन २,५०० रुपयांना विक्री करण्यात येत आहे.

शेअर करा

Posted by on Nov 18 2016. Filed under अर्थभारत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google