Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » अमेरिका भारताची बरोबरी का करू शकत नाही?

अमेरिका भारताची बरोबरी का करू शकत नाही?

=आर्थिक विकासावर ट्रम्प यांचा सवाल=
donald_trumpवॉशिंग्टन, [२९ ऑक्टोबर] – लोकसख्या आणि भौगोलिक व्याप अशा तुलनेत अतिशय विस्तारलेला भारतासारखा देश ८ टक्के अशा गतीने आर्थिक विकास करू शकतो, तर मग जगात आर्थिक महासत्ता अशी ओळख असलेला अमेरिका आर्थिक विकासात भारताची बरोबरी का करू शकत नाही, असा सवाल अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीतील रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनॉल्ड ट्रम्प यांनी उपस्थित केला.
येत्या ८ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रचारात ट्रम्प यांनी सातत्याने भारताचा उल्लेख केला आहे. आता त्यांनी आर्थिक विकास दराचा मुद्दा उपस्थित करून भारताच्या विकासाचा दर लक्षवेधक असल्याचे सांगितले आणि महासत्ता अमेरिका देखील अशाच गतीने आर्थिक विकास करू शकतो, असे मत व्यक्त केले.
चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत अमेरिकेच्या आर्थिक विकासाचा दर केवळ २.९ टक्के इतकाच होता. यासाठी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची आर्थिक धोरणेच प्रामुख्याने कारणीभूत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
बराक ओबामा यांच्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाची गती मंदावली आहे. ओबामा पहिले असे राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांच्या कार्यकाळात देशाचा आर्थिक विकासदर ३ टक्क्यांहून कमी राहिला. अमेरिका मोठा देश असल्याने आर्थिक विकास वेगाने होऊ शकत नाही, असा युक्तिवाद ते करतात. पण, भारतही मोठा देश आहे आणि त्याच्या आर्थिक विकासाचा दर ८ टक्के आहे. मग, आपण का करू शकत नाही, असा सवाल त्यांनी केला.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google