Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » उरी हल्ला आम्हीच केला

उरी हल्ला आम्हीच केला

=लष्कर-ए-तोयबाने फाडला शरीफांचा बुरखा=
terroristइस्लामाबाद, [२५ ऑक्टोबर] – जम्मू-काश्मीरच्या उरी येथील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हातच नाही, असा दावा करणारे आणि भारतविरोधात उलट्या बोंबा ठोकणारे पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा बुरखा आज पाकच्याच भूमीत आश्रयात असलेल्या लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी गटाने फाडला. उरी येथील दहशतवादी हल्ला आम्हीच केला होता, असे जाहीर करणारे पोस्टर्स या गटाने पंजाब प्रांताच्या गुजरानवाला येथे ठिकठिकाणी लावले आहेत.
उरी येथे हल्ला झाल्यानंतर भारताने अवघ्या सहा तासांतच पाकवर आरोप केला होता. कोणत्याही अतिरेकी हल्ल्यासाठी पाकला जबाबदार ठरविण्याची भारताची मानसिकताच झाली आहे. काश्मिरींवर तेथील सुरक्षा जवान जो अत्याचार करीत आहेत, त्याचा उद्रेक म्हणजे उरी हल्ला होय, असा अफलातून युक्तिवाद करून नवाझ शरीफ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. पण, तोयबाच्या या पोस्टर्समुळे शरीफांचे दात आता त्यांच्यात घशात अडकले.
उरी येथील हल्ल्याच्या काळात भारतीय जवानांनी ठार मारलेल्या चार अतिरेक्यांपैकी एक अतिरेकी आमच्यासाठी हिरो असून, त्याच्यासाठी आम्ही मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करणार आहोत. विशेष म्हणजे तोयबाचा म्होरक्या या विशेष नमाजाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती आहे. या पोस्टर्समध्ये त्या अतिरेक्याचे नाव मोहम्मद अनस असे नमूद करण्यात आले असून, तो गुजरानवालाचाच रहिवासी आहे. अबु सिरका या नावाने तो अतिरेक्यांना आवश्यक ते निर्देश देत होता.
तोयबाच्या या पोस्टर्समध्ये अनससाठी आयोजित विशेष नमाजात स्थानिक नागरिकांनाही सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. तो तोयबाचा सैनिक असून, त्याने इस्लामसाठी आपले प्राण दिले आहे. त्याने आतापर्यंत १७७ भारतीय सैनिकांना ठार मारले आहे, असेही यात म्हटले आहे.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google