Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » ओपेककडून तेल उत्पादन कपातीचा निर्णय

ओपेककडून तेल उत्पादन कपातीचा निर्णय

=इंधनाचे दर वाढले=
वृत्तसंस्था
व्हिएन्ना, १ डिसेंबर –
opec-organization-of-petroleum-exporting-countriesआंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरणारे खनिज तेल दर नियंत्रणात आणण्यासाठी अखेर इंधन उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयावर बुधवारी ओपेकतर्फे (ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्रीज) शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे ब्रेन्ट खनिज तेल दर लगेच उसळून प्रतिबॅरल ५१.३२  डॉलरपर्यंत पोहोचले. जानेवारीसाठी झालेल्या या व्यवहाराचे मूल्य एकाच दिवसात बॅरलमागे तब्बल  चार डॉलरने उंचावले. नऊ महिन्यांतील ही सर्वाधिक दरउसळी नोंदली गेली.
प्रमुख तेल उत्पादक १४ सदस्यीय देशांच्या व्हिएन्ना  येथे झालेल्या बैठकीत तब्बल आठ वर्षांनंतर प्रथमच इंधन उत्पादनात कपात करण्यावर एकमत झाले. याचा परिणाम लगेच दिसून आला असून खनिज तेलाचे दर बॅरलमागे ५० डॉलरपर्यंत पोहचले आहेत.
प्रमुख तेल उत्पादक देशांनी घेतलेल्या इंधन उत्पादन कपातीमुळे दिवसाला १२ कोटी बॅरल उत्पादन कमी होणार असून ते प्रतिदिन ३.२५ कोटी बॅरलपर्यंत खाली येणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम सौदी अरेबिया आणि इराक या देशांवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोव्हेंबरमध्ये प्रतिदिन १.०५ कोटी बॅरल उत्पादन करणार्‍या सौदी अरेबियाला आता प्रतिदिन एक कोटी बॅरल उत्पादन घ्यावे लागणार आहे.
तेल उत्पादन कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी जानेवारी २०१७ पासून होणार आहे. पुढील किमान सहा महिन्यांसाठी हा निर्णय कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरदेखील कपातीच्या निर्णयाला मुदतवाढ दिली जाऊ शकते.
प्रमुख तेल उत्पादकांच्या बुधवारच्या बैठकीत घेण्यात आलेला तेल उत्पादन कपातीचा निर्णय हा सकारात्मकच आहे, असे सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री खालिद अल फलिह यांनी म्हटले आहे. व्हिएन्ना येथे याबाबत झालेल्या बैठकीबाबत आम्ही पूर्वीपासूनच आशावादी होतो; तेल उत्पादन कपातीमुळे खनिज तेल दराला न्याय मिळेल, अशी आशा आहे, असेही ते म्हणाले.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google