Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » किर्गिस्तान देशाचे संविधानच गहाळ

किर्गिस्तान देशाचे संविधानच गहाळ

kyrgystan-mapबिशकेक, [२२ ऑक्टोबर] – किर्गिस्तानमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. देशाच्या संविधानाचा मूळ दस्तावेजच गहाळ झाला आहे. संसदेत एका कायद्यातील बदलाविषयीच्या विवादादरम्यान हा प्रकार समोर आला.
संसद सदस्य एका कायद्यामध्ये बदल करण्याविषयक चर्चा करत होते. त्या चर्चेच्या वेळी राजकीय नेत्यांना संविधानाचे मूळ कागदच हरविल्याचे कळले. २०१० मध्ये जनमत चाचणीद्वारे संविधानाच्या नव्या प्रारूपाला मंजूरी मिळाली होती. नव्या प्रारूपांतर्गत संसदेला जास्त महत्त्व देण्यात आले होते व त्याचबरोबर राष्ट्रपतींचे अधिकार कमी करण्याचाही अधिकार देण्यात आला होता.
१९ ऑक्टोबर रोजी किर्गिस्तान संसद सदस्यांनी संविधानाची मूळ कॉपी मागवली होती. डिसेंबरमध्ये आणखी एखादी जनमत चाचणी घेण्याबाबत संसदेत चर्चा सुरू होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या मूलभूत कायद्यात बदल घडविणे थांबविण्याकरिता संविधानाची मूळ प्रत गहाळ करविली गेली असल्याचे कळते. मात्र, असे असूनही संसद सदस्यांनी डिसेंबरमध्ये आणखी एक जनमत चाचणी घेण्यास बहुमताने मंजूरी दिली आहे.
दरम्यान, २०१० मध्ये देशातील वाढती महागाई, भ्रष्टाचार आणि विरोधी पक्षनेत्यांच्या अटकेविरोधात तीन शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली होती. परिणामी, राष्ट्रपती कुरमानबेक बाकियेव यांना पायउतारही करण्यात आले होते. सरकार विरोधी निदर्शनांदरम्यान झालेल्या रक्तपातात अनेक लोक मृत्यूमुखी पडल्याने विरोधी पक्षाने ‘जनतेचे सरकार’ स्थापन केले होते.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google