Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » झाकिरला नागरिकत्व दिले नाही

झाकिरला नागरिकत्व दिले नाही

=मलेशियाचे स्पष्टीकरण=
वृत्तसंस्था
क्वॉलालम्पूर, २८ नोव्हेंबर –
zakir-naikभारतातील वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकिर नाईकला आपल्या देशाने नागरिकत्व दिले असल्याच्या वृत्ताचे मलेशियाने खंडन केले आहे. आमचा देश कोणालाही अचानक नागरिकत्व देत नाही. या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात, असेही मलेशियाने स्पष्ट केले.
मलेशियन दाम्पत्याकडे देशातच जन्म घेणार्‍यांना मलेशियाचे नागरिकत्व मिळत असते, अन्यथा, नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी कितीतरी वर्षांची प्रतीक्षा करावी लागते, अशी माहिती गृह खात्याचे उपमंत्री दातूक नूर झजलान मोहम्मद यांनी दिली. भारतात देशद्रोहासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या झाकिर नाईकला मलेशियाने नागरिकत्व दिले असल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले होते. यावर त्यांनी उपरोक्त भूमिका विशद केली.
मलेशियन नागरिकत्वासाठी असंख्य प्रक्रियांमधून जावे लागते. यात अनेक वर्षे निघून जातात. शिवाय, झाकिर हा आमच्यासाठी विशेष महत्त्वाचा धार्मिक नेता नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मोहम्मद यांनी झाकिरला नागरिकत्व दिले नसल्याचे जाहीर केले असले, तरी गृहमंत्री झहिद हमिदी यांनी झाकिरला कायमचा रहिवासी दर्जा दिला असल्याच्या प्रश्‍नावर मौन पाळले. हिंदू हक्क कृती दल या स्वयंसेवी संस्थेने त्यांना याबाबत विचारणा केली होती.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google