Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » प्रौढ चित्रपट अभिनेत्रीने केला ट्रम्पवर लैंगिक शोषणाचा आरोप

प्रौढ चित्रपट अभिनेत्रीने केला ट्रम्पवर लैंगिक शोषणाचा आरोप

adult-film-star-jessica-drake-accuses-donald-trump-of-sexual-misconductक्लीवलॅण्ड, [२३ ऑक्टोबर] – अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक रिंगणात असलेले रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका प्रौढ चित्रपटाच्या अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला एक महिन्यापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे आणि ट्रम्प यांची स्थिती नाजूक असताना त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे निवडणूक प्रचारावर परिणाम पडण्याची शक्यता आहे.
प्रौढ चित्रपटाची अभिनेत्रीचे नाव जेसिका ड्रेक असून लॉस एंजेलिस येथे आयोजित पत्रपरिषदेत ४२ वर्षीय जेसिकाने म्हणाली की, १० वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियाच्या लेक ताहो येथे ट्रम्प यांना भेटली होती. हॉटेलमध्ये मला ट्रम्पच्या खोलीत बोलविण्यात आले व त्यानंतर मी काही मैत्रिणींसमवेत तिथे गेली. तेव्हा ट्रम्प यांनी मला व माझ्या अन्य दोन मैत्रिणींना पकडले आणि बळजबरीने चुंबन घेतले. त्यानंतर मला त्यांच्या हॉटेलच्या खोलीत येण्यासाठी १० हजार डॉलर्स देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
या घटनेनंतर एका अनोळखी व्यक्तीने ट्रम्पच्यावतीने फोन करून मला पुन्हा खोलीत येण्यास सांगितले, परंतु यावेळी मला एकटीलाच बोलविले होते. मात्र या प्रस्तावाला जेसिकाने नकार दिला.
यापूर्वीही अनेक आरोप
२००५ साली डोनाल्ड ट्रम्प यांचा एक अश्‍लील व्हिडीओ सार्वजनिक झाल्यानंतर आतापर्यंत ११ महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प असभ्य भाषेत बोलताना दिसत होते. त्यानंतर ट्रम्प वादाच्या भोवर्‍यात सापडले आणि अखेर त्यांनी माफी मागितली होती.
आरोप फेटाळले
याच दरम्यान, ट्रम्पसाठी प्रचार अभियान राबवित असलेल्या चमूने जेसिकाचे आरोप फेटाळून लावले. ही कहाणी पूर्णतः खोटी आहे. ट्रम्प या महिलेला ओळखत नाही आणि ट्रम्प यांनी त्या महिलेशी ओळख करून घेण्यात कधीही रुची नव्हती. हे आरोप म्हणजे रिपब्लिकन उमेदवार ट्रम्प यांना बदनाम करण्यासाठी क्लिटंनच्या गोटातून झालेला केवळ व केवळ एक प्रयत्न आहे.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google