Home » क्रीडा » खर्चांचा तपशिल लोढा पॅनलकडे सादर करा: न्यायालय

खर्चांचा तपशिल लोढा पॅनलकडे सादर करा: न्यायालय

=बीसीसीआयला संमिश्र धक्का=
supreme-court_6नवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] – भारत व इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत राजकोट येथे उद्यापासून ( ९ नोव्हेंबर) सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आर्थिक निर्बंध हटवावे यासाठी धाव घेतली होती. त्या अर्जावर गंभीरतेने विचार झाल्यानंतर बीसीसीआयला राजकोट कसोटीसाठी होणार्‍या आर्थिक व्यवहारासाठी लागणार्‍या निधीला मंजुरी देण्यात आली. तसा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरील चिंतेचे सावट दूर झाले आहे. पण खर्चाचा तपशिल लोढा पॅनलकडे सादर करण्याची अट टाकण्यात आल्याने त्यांच्यात थोडीशी चिंता पसरली आहे.
या निर्णयाकडे बघता ९ नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या पहिल्या कसोटीवरील संकटांचे ढग काी अंशी बाजूला झाले आहेत.
न्यायालयाने राजकोट कसोटीसाठी ५८ लाख ६६ हजार रुपयांच्या निधीला मंजुरीही दिली आहे. या निधीतील राशी इंग्लिश क्रिकेट मंडळ, थर्ड एम्पायर आणि विमा यात वाटली जाणार आहे. यासोबतच मालिकेतील अन्य सामन्यांसाठीही निधी मिळणार आहे. या खर्चांचा संपूर्ण तपशिल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला न्या. लोढा पॅनलकडे सादर करणे बंधनकार राहणार असल्याचेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. अंकेक्षकही झालेल्या खर्चावर देखरेख ठेवणार आहे.
आज न्यायालयाने लोढा पॅनलमध्ये अन्य नियुक्तीलाही मान्यता बहाल केली आहे. बीसीसीआयने केलेल्या कराराची पाहणी करण्यासाठी प्रशासकीय समितीही आणि सचिवांची नियुक्ती करू शकते.
…तर राजकोट कसोटी रद्द होवू शकते : सिब्बल
भारत व इंग्लंड संघातील पहिली कसोटी उद्यापासून राजकोट येथे खेळली जात आहे. सामना व्यवस्थित खेळला जावा यासाठी निधीची आवश्यकता आहे अशी बाजू घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी धाव घेतली होती.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशापूर्वी
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला कोणतेही आर्थिक निर्णय घेण्यावर बंधने टाकली आहेत. लोढा समितीच्या शिफारसी मान्य केल्यानंतरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आर्थिक व्यवहार करण्याची मोकळीक होईल.
न्यायमूर्ती अनिल दवे आणि न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपिठासमोर बाजू मांडताना बीसीसीआयचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, जर बीसीसीआयला निधॅ मिळाला नाही, तर राजकोटची कसोटी रद्द होवू शकतो.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google