Home » क्रीडा » द्रविडच्या मार्गदर्शनामुळेच कणखर : पंड्या

द्रविडच्या मार्गदर्शनामुळेच कणखर : पंड्या

hardik_नवी दिल्ली, [४ नोव्हेंबर] – भारतीय कसोटी संघात प्रथमच स्थान मिळवलेल्या हार्दिक पंड्याने याचे श्रेय भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिले आहे. द्रविड यांच्या मार्गदर्शनामुळे मी मानसिकदृष्ट्या बळकट झालो, असे मत हार्दिकने व्यक्त केले आहे.
भारतीय अ संघाबरोबर मी ऑस्ट्रेेलियाच्या दौर्‍यावर गेलो होतो आणि यानंतर माझे आयुष्यच बदलले. एक क्रिकेटपटू म्हणून या दौर्‍यात मला बरेच काही शिकता आले. क्रिकेटमध्ये फक्त शारीरिक तंदुरुस्तीच महत्त्वाची नसते तर मानसिक कणखरताही महत्त्वाची असते, हे मला द्रविड यांनी सांगितले आणि त्यानंतर खेळाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला, असे पंड्याने सांगितले.
पंड्या पुढे म्हणाला, ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असताना मी दीड महिना द्रविड सरांच्या सान्निध्यात होतो. या दौर्‍यानंतर माझ्यात बरेच बदल झाले आणि हे बदल मानसिक होते. कोणत्या गोष्टी करायला हव्यात, हे त्यांनी मला सांगितले. आता माझ्या गोलंदाजीबद्दल चर्चा होते, याचे श्रेय मी द्रविड आणि भारतीय अ संघाचे प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांना देईन.
कसोटी संघात स्थान मिळवल्याबद्दल पंड्याला विचारल्यावर तो म्हणाला की, कसोटी क्रिकेट खेळणे हे प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाचे असते, माझ्यासाठीही हे महत्त्वाचेच आहे. आतापर्यंतच्या कारकीर्दीत माझे हे सर्वात मोठे यश आहे. आपल्या गोलंदाजीविषयी पंड्या म्हणाला, गोलंदाजीचा तुम्ही जेवढा सराव करता तेवढे तुम्ही अचूकतेच्या जवळ जात असता.

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google