Home » क्रीडा » पहिल्या कसोटीतून वेगवान गोलंदाज ऍण्डरसन बाहेर

पहिल्या कसोटीतून वेगवान गोलंदाज ऍण्डरसन बाहेर

james-andersonढाका, [२० ऑक्टोबर] – इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ऍण्डरसन अद्याप खांद्याच्या दुखापतीतून सावरला नाही आणि भारताविरुद्ध पुढील महिन्यात प्रारंभ होणार्‍या दौर्‍यात पहिल्या कसोटीतून बाहेर झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार ऍलेस्टेयर कुकने बुधवारी ही माहिती दिली.
ऍण्डरसन अजून पूर्णपणे तंदुरुस्त झाला नाही व भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत तो संघाचा सदस्य राहणार नाही. इंग्लंड संघ नोव्हेंबर महिन्यात भारत दौर्‍यावर येत असून पहिला कसोटी क्रिकेट सामना ९ ते १३ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे.
ऍण्डरसन खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेश दौर्‍यात सुद्धा संघात सहभागी झाला नाही. ऍण्डरसनला काही ट्रेनिंग देऊ शकतो, परंतु तो पहिल्या कसोटीपर्यंत पूर्णपणे सज्ज होऊ शकणार नाही. मी त्याच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. तो शारीरिक दृष्टीने तंदुरुस्त होण्यासाठी बरेच प्रयत्न करीत आहे. आम्ही या संदर्भात पुढील आठवड्यापर्यंत काही निर्णय घेणार आहो, असे कुकने सांगितले.
जेव्हा तो गोलंदाजी करु लागेल, तेव्हाच त्याची खरी परीक्षा राहील. ३४ वर्षीय ऍण्डरसन या वर्षभर दुखापतीने त्रस्त राहिला व पाकिस्तानविरुद्ध लॉर्डस् येथे सुद्धा पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर तो खांद्याच्या दुखापतीमुळे देशांतर्गत मोसमातसुद्धा भाग घेऊ शकला नव्हता.

शेअर करा

Posted by on Oct 21 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google