Home » क्रीडा » भारताची सामन्यावर मजबूत पकड

भारताची सामन्यावर मजबूत पकड

•जडेजाच्या कसोटीतील सर्वोत्तम ९० धावा
•फलंदाजांनी झळकावले अर्धशतक
•बेन स्टोक्स ५ बळी, रशिदचे ४ बळी,
वृत्तसंस्था
मोहाली, २८ नोव्हेंबर –
Ind vs Eng, 3rd Test, Day 3रवींद्र जडेजाचे पहिले कसोटी शतक थोडक्यात हुकले, परंतु त्याने कसोटीतील सर्वोत्तम ९० धावांची प्रशंसनीय कामगिरी केली. जडेजाच्या या कामगिरीसह जयंत यादवच्या पहिल्या कसोटी अर्धशतकाच्या जोरावर भारताने तिसर्‍या दिवशी इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात १३४ धावांची आघाडी मिळविली. जडेजाने आर. अश्‍विनसोबत ९७ धावांची, त्यानंतर जयंत यादवसोबत आठव्या गड्यासाठी ८० धावांची भागीदारी केली हे विशेष. दिवसअखेरीस इंग्लंडने दुसर्‍या डावात ३८ षटकात ४ गडी गमावित ७८ धावांची नोंद केली. इंग्लंड अजून ५६ धावांनी पिछाडीवर असून त्यांच्याकडे ६ फलंदाज शिल्लक आहेत. भारताने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील २८३ धावांना प्रत्युत्तर देताना भारताने तिसर्‍या दिवशी ६ बाद २७१ धावांवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. स्टोक्सने उमेशला बाद करताच भारताचा डाव ४१७ धावांवर संपला व चहापान घेण्यात आला. आर. अश्‍विनने ७२, जडेजाने ९० व जयंत यादवने ५५ धावांची खेळी केली. भारताच्या ८४ वर्षांच्या आणि ५०५ कसोटी क्रिकेट सामन्यांच्या इतिहासात प्रथमच सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावरील फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. भारताच्या अखेरच्या चार फलंदाजांनी २३० धावांची भर घातली असून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात या क्रमांकावर सर्वाधिक योगदान आहे. मोहाली कसोटी भाताच्या पाच फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. जडेजा, अश्‍विन, जयंत यादव यांच्यासह विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारानेसुद्धा अर्धशतक साजरे केले. अश्‍विनने ११३ चेंडूंच्या खेळीत ११ चौकार, जडेजाने १७० चेंडूंत १० चौकार व एक षठकार खेचला, तर जयंतने १४१ चेंडूंत ५ चौकार खेचले.
या सामन्यात इंग्लंडच्या बेन स्टोक्स व आदिल रशिदने नऊ बळी टिपले. स्टोक्सने ७३ धावात ५ बळी, तर आदिल रशिदने ११८ धावांत ४ बळी टिपले.
चहापानानंतर इंग्लंडने दुसर्‍या डावाला सुरूवात केली, परंतु जो रूटवगळता अन्य फलंदाज भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकले नाही. तिसर्‍या दिवसअखेरपर्यंतच्या खेळीत इंग्लंडने ३८ षटकात ७८ धावात ४ फलंदाज गमावले. खेळ थांबला तेव्हा जो रूट ३६ धावांवर, तर बॅट्टी शून्यावर खेळत होते. अश्‍विनने ३ बळी, तर जयंत यादवने १ बळी टिपला.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः २८३.
भारत पहिला डाव ः (कालच्या ६ बाद २७१ धावांवरून पुढे) आर. अश्‍विन झे. बटलर गो. स्टोक्स ७२, रवींद्र जडेजा झे. वोक्स गो. रशिद ९०, जयंत यादव झे. अली गो. स्टोक्स ५५, उमेश यादव झे. बेअरस्टोव गो. स्टोक्स १२, मोहम्मद शमी नाबाद ०१, अवांतर १६, एकूण १३८.२ षटकात सर्वबाद ४१७.
गडी बाद होण्याचा क्रम ः ७-३०१, ८-३८१, ९-४१४, १०-४१७.
गोलंदाजी ः ऍण्डरसन २१-४-४८-०, वोक्स २४-७-८६-०, मोहम्मद अली १३-१-३३-०, आदिल रशिद ३८-६-११८-४, बेन स्टोक्स २६.२-५-७३-५, बॅट्टी १६-०-४७-०.
इंग्लंड दुसरा डाव ः ऍलिएस्टर कुक त्रि. गो. अश्‍विन १२,
जो रूट खेळत आहे ३६, मोहम्मद अली झे. जयंत यादव गो. अश्‍विन ०५, बेअरस्टोव झे. पटेल गो. जयंत यादव १५, बेन स्टोक्स पायचीत गो. अश्‍विन ०५, बॅट्टी खेळत आहे ००, अवांतर ०५, एकूण ३८ षटकात ४ बाद ७८.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-२७, २-३९, ३-७०, ४-७८.
गोलंदाजी ः मोहम्मद शमी ७-२-१७-०, उमेश यादव १-०-७-०, आर. अश्‍विन १२-३-१९-३, रवींद्र जडेजा १२-४-१८-०, जयंत यादव ६-१-१२-१.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google