Home » क्रीडा » भारत-इंग्लंड मालिकेत डीआरएस वापरणार

भारत-इंग्लंड मालिकेत डीआरएस वापरणार

=बीसीसीआयची मंजूरी=
bcci-logoमुंबई, [२१ ऑक्टोबर] – डीआरएस प्रणालीत करण्यात आलेल्या सुधारणांचे परीक्षण बीसीसीआय करणार आहे. या परीक्षणात समाधान झाल्यानंतरच बीसीसीआय डीआरएस प्रणालीला भारत-इंग्लंडदरम्यानच्या मालिकेत पूर्ण क्षमतेसह वापरणार आहे, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
आयसीसी व हॉकआयच्या अधिकार्‍यांनी बोर्डाद्वारे व्यक्त केलेल्या शंकांचे व काही सूचनांवर बर्‍याच प्रमाणात लक्ष दिले व समाधान केले.
या बदलांमध्ये एक बदल म्हणजे अल्ट्रामोशन कॅमेर्‍यांचा समावेश करणे आहे. यामुळे चेंडूच्या दिशेवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाऊ शकेल व त्याचे अचूक आकलनसुद्धा करता येेऊ शकेल.
डीआरएसमध्ये आता प्रभाव बिंदू निश्‍चित करण्यासाठी मानवीय हस्तक्षेपसुद्धा होईल, त्याला अल्ट्रा ऐज तंत्राच्या माध्यमातून नियंत्रित केले जाईल.
हॉकआयने आता अशा तर्‍हेचे तंत्र विकसित केले आहे की, ते सर्व प्रक्रियेला रेकॉर्ड व त्याचे सर्व चित्र सुरक्षित करून ठेवेल. कोणत्याही कारणामुळे जर ऑपरेटर ट्रेकिंग सिस्टमला पकडू शकले नाही, र तो या चित्रांचा उपयोग करु शकेल.
या प्रणालीला अधिक उत्कृष्ट करण्यासाठी अतिरिक्त कॅमेर्‍यांचा सुद्धा आता वापर केला जाईल. याशिवाय डीआरएससाठी फिरकी गोलंदाजीला उत्तमरितीने बघण्यासाठी शंभर टक्के विश्‍वसनीय अवलोकन सुविधा उपलब्ध होईल. हे सर्व काही बीसीसीआयच्या सूचनांवर आधारित आहे. या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर उपस्थित होते.
हॉकआयने आम्ही केलेल्या सर्व शिफारशींवर लक्ष दिले, यामुळे मी खूश आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेत डीआरएस प्रणालीच्या सुधारित तंत्राचा प्रायोगिक तत्वावर वापर करता येईल, असे अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. या मालिकेत या प्रणालीचे प्रदर्शन आणि यातून मिळणार्‍या प्रतिक्रियेनंतरच आम्ही पुढील मालिकेत डीआरएस प्रणाली कायम ठेवण्याबाबत विचार करू, असेही ते म्हणाले.
भारत आणि इंग्लंडदरम्यानची मालिका ९ नोव्हेंबर ते एक फेब्रुवारीदरम्यान खेळली जाणार आहे. यादरम्यान पाच कसोटी, तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने व तीन टी-२०सामने खेळले जाणार आहे.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google