Home » क्रीडा » विदेशी प्रशिक्षण मिळावे : साक्षी

विदेशी प्रशिक्षण मिळावे : साक्षी

sakshi-malikहिस्सार, [१ नोव्हेंबर] – येत्या ऑलिम्पिकमध्ये अधिक पदके पटकावण्यासाठी आतापासूनच सरावावर भर देण्यात यावा आणि वेळ पडली तर विदेशातील प्रशिक्षणही देण्यात यावे असे मत भारताची रियो ऑलिम्पिक कांस्यपदक प्राप्त मल्ल साक्षी मलीक हिने व्यक्त केले.
प्रो कुस्ती लीगमध्ये भाग घेण्यासाठी साक्षी जाणार आहे. त्यापूर्वी ती पत्रकारांशी बातचित करताना म्हणाली की, देशातील आणि विदेशातील प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणार्थींच्या उणीवा प्रकर्षाने समोर येत असतात. त्या दूर करण्यासाठी स्पर्धकांना अधिकाधिक प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असते.
प्रशिक्षण शिबिर घेण्याची केवळ औपचारिकता पूर्ण करण्यावर भर असू नये असे परखड मत मांडून साक्षी म्हणाली की, स्पर्धकांना डॉक्टरांची विशेष सेवा मिळावयास हवी व फिजिओथेरेपिस्टही मिळावयास हवा.
देशातील कुस्ती हा एक चिेंतेचा विषय ठरत आहे. एकीकडे हजारो मुली कुस्तीचा सराव करीत आहेत. तर दुसरीकडे केवळ एक महिला ऑलिम्पिक पदक खेचून आणते ही कुस्तीची सकारात्मक दिशा ठरत नाही. प्रतिकूल परिस्थिती दूर होईल यात शंका नाही, पण देशातील युवतींनी मोठ्या संख्येत कुस्तीकडे वळावे असे आवाहन तिने केले.

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google