Home » क्रीडा, छायादालन » कोहली, जडेजाला कारकीर्दीतले सर्वोत्तम स्थान

कोहली, जडेजाला कारकीर्दीतले सर्वोत्तम स्थान

=आयसीसी कसोटी मानांकन=
वृत्तसंस्था
दुबई, ३० नोव्हेंबर –
ravindra-jadeja-virat-kohliभारतीय कसोटी संघ ककोहली, जडेजाला कारकीर्दीतले सर्वोत्तम स्थान र्णधार विराट कोहली मोहालीत इंग्लंडवर ८ गड्यांनी विजय नोंदविल्यानंतर फलंदाजीच्या नवीन आयसीसी कसोटी मानांकनात कारकीर्दीतले सर्वश्रेष्ठ तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
कोहलीने इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरूवात १५ व्या स्थानावरून केली होती आणि आपल्या मानांकनात झपाट्याने प्रगती केली. त्याने आतापर्यंत मालिकेत ३ सामन्यातून ४०५ धावांची नोंद केली आहे. भारताने मालिकेत २-० अशी आघाडी मिळविली आहे.
पुढील दोन कसोटीत विराटच्या मानांकनात सुधारणा
तिसर्‍या कसोटी क्रिकेट सामनत कोहलीने ६० व नाबाद ६ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याचे ८३३ गुण झाले आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मानांकनात प्रथम आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मानांकनात दुसर्‍या स्थानावर असलेला कोहली आता इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यात आपल्या मानांकनात आणखी सुधारणा करू इच्छिणार आहे. चेतेश्‍वर पुजारा ८ व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ अव्वल स्थानावर आहे.
अष्टपैलू जडेजाला कारकीर्दीतले सर्वोत्तम चौथे स्थान
मोहाली कसोटीत ९० धावांची आकर्षक खेळी आणि ४ बळी टिपणार्‍या सामनावीर रवींद्र जडेजानेसुद्धा अष्टपैलू खेळाडूंच्या मानांकनात दोन स्थान झेप मारली असून त्याने कारकीर्दीतले सर्वोत्तम चौथे स्थान प्राप्त केले आहे. भारतीय फिरकीपटू रवीचंद्रन अश्‍विनने ४९३ गुणांसह गोलंदाजी आणि अष्टपैलू या दोन्हींच्या मानांकनात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मोहालीत पाच बळी टिपणारा मोहम्मद शमी २१ व्या क्रमांकावरून १९ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
इंग्लंडचा जो रूट दुसर्‍या स्थानावर
इंग्लंडचा जो रूट दुसर्‍या स्थानावर असून तो कोहलीपेक्षा १४ गुणांनी पुढे आहे. मोहालीत ८९ व १५ धावांची खेळी खेळल्यानंतर इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोवने तीन स्थानांची झेप मारली. तो अव्वल दहामध्ये ९ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

शेअर करा

Posted by on Nov 30 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google