Home » क्रीडा, छायादालन » पहिली कसोटी अनिर्णीत अवस्थेकडे

पहिली कसोटी अनिर्णीत अवस्थेकडे

=इंग्लंडची भारतावर १६३ धावांची आघाडी=
rahane-out-india-england-test-4th-dayराजकोट, [१२ नोव्हेंबर] – पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत शनिवारी खेळाच्या चवथ्या दिवसअखेर इंग्लंडने भारतावर एकूण १६३ धावांची आघाडी घेतली आहे. उद्या सामन्याचा पाचवा व शेवटचा दिवस आहे, त्याकडे बघता ही कसोटी अनिणींत अवस्थेकडे वळली आहे.
भारतावर पहिल्या डावात ४९ धावांची अल्प आघाडी घेण्यात इंग्लंडला यश आले. ती आघाडी घेत इंग्लंडच्या कूक व हमीद या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजीचा मारा सहजतेने खेळून काढला. एकूण ३७ षटकांचा खेळ त्यांनी केला व या काळात भारताचा एकही गोलंदाज ही जोडी फोडू शकला नाही. भारतीय गोलंदाजीची धार बोथट करून कूक ३ चौकारांच्या मदतीने ४६ व हमीदने पाच चौकार व एक षटकाराच्या मदतीने ६२ धावा नोंदविल्या.
या जोडीने शामी, यादव, जडेजा, अश्‍विन, व मिश्रा या पाच गोलंदाजांचा लिलया सामना केला व पहिल्या गड्यासाठी ११४ धावांची नाबाद भागी केली आहे. पहिल्या डावातील ४९ धावांची आघाडी धरल्यास इंग्लंडने भारतावर एकूण १६३ धावांची आघाडी घेतली आहे. त्यांचे दहाही गडी शेष आहेत. त्यांनी रविवारी लवकर डावाची घोषणा केली नाही, तर पहिली कसोटी अनिर्णीत राहू शकते.
याअगोदर कालच्या ४ बाद ३१९ या धावसंख्येवरून भारताच्या विराट कोहली (२९) व अजिंक्य राहाणे यांनी डाव पुढे रेटला. पण ४० धावा काढल्यानंतर कर्णधार विराट कोहली स्व:चित झाला. त्यापूर्वी राहाणे केवळ १३ धावा काढून बाद झाला होता.
रविचंद्रन अश्‍विनने भारताची बाजू सावरली. त्याने १९९ मिनिटांच्या खेळात १३९ चेंडूंचा सामना केला व मोलाच्या ७० धावा काढल्या. साहाने ३५ धावा जोडल्या. भारताचा डाव १६२ षटकात ४८८ धावात आटोपला होता. रशीदने ११४ धावात ४ गडी बाद केले होते.
धावफलक असा : इंग्लंड पहिला डाव ५३७ धावा व दुसरा डाव ३७ षटकात बिनबाद ११४ धावा (कुक खेळत आहे ४६, हमीद खेळत आहे ६२, इतर धावा ६)
गोलंदाजी : मोहम्मद शामी ६-१-१२-९, डिेजा १०-१-३३-०, अश्‍विन १०-२-३२-०, यादव ५-१-१३-०, मिश्रा ६-०-१९-०.
भारत पहिला डाव ४८८ धावा (मुरली विजय झे. हमीद गो. रशीद १२६, गौतम गंभीर पायचित गो. ब्रॉड २९, चेतेश्वर पुजारा झे. कुक गो. स्टोक्स १२४, विराट कोहली स्व:चित गो. रशीद ४०, अमित मिश्रा झे. हमीद गो. अन्सारी ०, अजिंक्य राहाणे त्रिफळा गो. अन्सारी १३, रविचंद्रन अश्‍विन झे. अन्सारी गो. अली ७०, साहा झे. बेअरस्टोव गो. अली ३५, रवीन्द्र जडेजा झे. हमीद गो. रशीद १२, उमेश यादव झे. स्टोक्स गो. रशीद ५, मोहम्मद शामी नाबाद ८, इतर २६ धावा).
गडी बाद : १-६८, २-२७७,३-३१८, ४-३१९, ५-३४९, ६-३६१, ७-४२५, ८-४४९, ९-४५९, १९-४८८.
गोलंदाजी :
ब्रॉड २९-९-७८-१, वोक्स ३१-६-५७-०, मोईन अली ३१-७-८५-२, अन्सारी २३-१-७७-२, रशीद ३१-१-११४-४, स्टोक्स १७-२-५२-१.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google