Home » क्रीडा, छायादालन » पी. व्ही. सिंधू सज्ज

पी. व्ही. सिंधू सज्ज

=फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा=
pv-sindhuपॅरिस, [२४ ऑक्टोबर] – डेन्मार्क खुल्या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी दाखवल्यानंतर भारताची रियो ऑलिम्पिक रौप्यपदक प्राप्त पी. व्ही. सिंधू फ्रेंच खुल्या महिला बॅडमिंटनकडे वळली आहे. उ द्यापासून फ्रेंच खुली स्पर्धा सुरू होत आहे.
रियो ऑलिम्पिकनंतर सिंधूने तिच्या जिवनातील पहिल्या सुपर सिरीज डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चांगली कामगिरी बजावणार असे वाटत असतानाच सिंधू स्पर्धेच्या दुसर्‍याच फेरीत पराभूत झाल्याने भारतीयांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता. आता तिने डेन्मार्क स्पर्धेतील पराभवाला मागे सोडून संपूर्ण लक्ष फ्रेंच स्पर्धेकडे लावले आहे. तिचा पहिला सामना हॉंगकॉंगच्या यिप यिन हिच्याशी होणार आहे.
स्टेड पिपरे डी कुबलीन स्टेडियममध्ये स्पर्धा होणार असून पहिल्या फेरीत सिंधूने विजयाची नोंद केल्यास तिला दुसर्‍या फेरीत चीनच्या बिंगजियाओशी खेळावे लागणार आहे. डेन्मार्क खुल्या स्पर्धेतील पहिल्याच फेरीत सिंधूने तिच्यावर विजय नोंदविला होता, हे येथे विशेष.
पुरुष एकेरीत डच खुल्या स्पर्धेतील उपविजेता भारताचा अजय जयराम पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉमध्ये आलेल्या स्पर्धकाशी खेळणार आहे. तर स्विस खुल्या स्पधेंतील विजेता एच. एस. प्रणय याला पहिल्या फेरीत थायलंडच्या पोन्सानाशी खेळावे लागणार आहे.
कॅनडा खुल्या स्पर्धेतील विजेता भारताचा साईप्रणीतसमोर कोरियाचा अव्वल खेळाडू ली ह्यूनचे आव्हान राहणार आहे.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google