Home » क्रीडा, छायादालन » बलाढ्य ब्राझीलचा अर्जेटिनावर विजय

बलाढ्य ब्राझीलचा अर्जेटिनावर विजय

brazil-vs-argentinaबेलो होरिझोन्टो , १४ नोव्हेंबर –
विश्‍व करंडक पात्रता फेरींच्या फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य ब्राझील संघाने अर्जेटिनाचा ३-० गोलने पराभव केला. पराभूत संघात विख्यात खेळाडू लियोनेल मेस्सीचा समावेश होता. या पराभवाकडे बघता अर्जेटिनाला फिफा विश्‍व करंडकाच्या पात्रतेचा मार्ग बंद होण्याची दाट भीती आहे.
कोन्टिनियो, नेमार आणि पॉलिन्योन यांनी ब्राझीलकडून प्रत्येकी एक गोल केला. या विजयासह ब्राझीलने २४ गुणांसह गटात आघाडी घेतली आहे. पराभूत अर्जेटिना संघ गटात सहाव्या स्थानावर माघारला आहे. दक्षिण अमेरिकेतून गुणतालिकेत पहिल्या चार क्रमांकावर राहणार्‍या संघांनाच पुढील विश्‍व करंडकात भाग घेण्याची संधी मिळू शकते हे येथे विशेष. विश्‍व करंडकासाठी धडक द्यावयाची असल्यास गटात अर्जेटिनाला किमान पाचवे स्थान मिळवावे लागणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 15 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google