Home » क्रीडा, छायादालन » भारताचा इंग्लंडवर नेत्रदीपक विजय

भारताचा इंग्लंडवर नेत्रदीपक विजय

=पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी=
वृत्तसंस्था
विशाखापट्टणम, २१ नोव्हेंबर –
ind-win-vizag-testदुसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्यात आज खेळाच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी भारताने पाहुण्या इंग्लंड संघाचा २४६ धावांनी दणदणीत पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पहिली कसोटी अनिर्णीत ठेवण्यात भारताला यश आले होते.
कसोटी जिंकण्यासाठी भारताने इंग्लंड समोर दुसर्‍या डावात ४०५ धावांचे आव्हान दिले होते. त्याला प्रत्युत्तर देत खेळाच्या चवथ्या दिवशी इंग्लंड संघाने २ बाद ८७ धावा केल्या होत्या. रूट पाच धावांवर खेळत होता.
आज शेवटच्या दिवशी त्यांना ३१८ धावांची आवश्यकता होती व हाताशी आठ गडी शेष होते. ही कसोटी अनिर्णीत ठेवण्याचाच त्यांचा प्रयत्न राहणार होता. पण भारताच्या फिरकीपटूंपुढे इंक्लंडचे फलंदाज पार गोंधळून गेले. चेंडू मस्त वळत होते. कधी उसळीही घेत होते. त्यामुळे फलंदाजांना चेंडू खेळून काढताना बरीज सर्कस करावी लागत होती.
काल ७५ धावांवर एक गडी बाद झाला होता. त्यानंतर ८७ धावसंख्येवर त्यांचा दुसरा गडी बाद झाला होता.
आज इंग्लंडने रूट सोबत डुकेट खेळावयास आला. पण धावसंख्येत केवळ पाच धावांची भर पडत नाही तोच डुकेट याला रविचंद्रन अश्‍विन याने यष्टिमागे झेलबाद केले. तो भोपळाही फोडू शकला नाही. १०१ ते ११५ या धावसंख्येच्या काळात अली, स्टोक्स व रूट या तिघांना इंग्लंडने गमावले. आज जयंत यादव व मोहम्मद शामी यांनी इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. अपवाद फक्त बेअरस्टोव याचा होता. तो ३४ धावा काढून नाबाद राहिला.
तळातील चार फलंदाज केवळ ९ धावा जोडू शकले. अन्सारी व ऍण्डरसन तर शून्यावरच तंबूत परतले.
डुकेट (०), अली (६), रशीद (४), अन्सारी  (०), ब्रॉड (५) व ऍण्डरसन (०) हे अंतिम सहा फलंदाज केवळ १५ धावा नोंदवू शकले.  शेवटी ९७.३ षटकात इंग्लंडचा दुसरा डाव १५८ धावात गुंडाळून भारताने दुसरी कसोटी २४६ धावांच्या फरकाने जिंकली व ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
पहिल्या डावात १६७ व दुसर्‍या डावात ८१ धावांची खेळी करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली सामनावीरचा मानकरी ठरला. या सामन्यात त्याने एकूण २४८ धावा काढल्या.
धावफलक असा : भारत पहिला डाव १२९.४ षटकात ४५५ धावा व दुसरा डाव ६३.१ षटकात २०४ धावा मात इंग्लंड पहिला डाव १०२.५ षटकात सर्वबाद २५५ धावा व दुसरा डाव ९७.३ षटकात सर्वबाद १५८ धावा (ऍलेस्टर कुक पायचित जडेजा ५४, हमीद पायचित गो. रविचंद्रन अश्‍विन २५, जे. रूट पायचित गो. मोहम्मद शामी २५, डुकेट झे. साहा गो. अश्‍विन ०, अली झे. कोहली  गो. जडेजा २, स्टोक्स त्रिफळा गो. जयंत यादव ६, बेअरस्टोव नाबाद ३४, रशीद झे. साहा गो. मोहम्मद शामी ४, अन्सारी त्रिफळा गो. अश्‍विन ०, ब्रॉड पायचित गो. जयंत यादव ५, ऍण्डरसन पायचित गो. जयंत यादव ०, इतर धावा ३).
गडी बाद : १-७५, २-८७, ३-९२, ४-१०१, ५-११५, ६-११५, ७-१२९, ८-१४३, ९-१५८, १०-१५८.
गोलंदाजी : मोहम्मद शामी १४-३-३०-२, उमेश यादव ८-३-८-०, रवीन्द्र जडेजा ३०-११-५२-३, रविचंद्रन अश्‍विन ३४-१४-३५-२, जयंत यादव ११.३-४-३०-३.     सामनावीर : विराट कोहली.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google