Home » क्रीडा, छायादालन » भारताची विंडीजवर सहज मात

भारताची विंडीजवर सहज मात

=एक दिवसीय आंतरराष्ट्रीय झुंज=
womens-test-cricket-vijaywadaविजयवाडा, [१३ नोव्हेंबर] –
महिलांच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीज संघावर पाच गडी राखून पराभव केला त्यावेळी ७२ चेंडू शेष होते. ३ सामन्यांच्या  मालिकेत भारताने २-० ची आघाडी घेत मालिका जिंकली.
आज प्रथम फलंदाजी करीत वेस्ट इंडीज संघाने ५० षटकात ७ बाद १५३ धावा केल्या. त्यात सर्वाधिक ६३ धावांची खेळी डॉटिनने केली. ऍल्युगेईराने २५ धावा काढल्या. भारताच्या गोस्वामी व बिश्ट यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
विजयाचे १५४ धावांचे आव्हान भारताने सहज स्वीकारले. ३८ षटकात ५ गडी गमावून १५४ धावा केल्या व सामना ७२ चेंडू शेष ठेवून जिंकला.
सलामीची फलंदाज मंधानाने ४४, शर्माने ३२, मिताली राजने ४५ धावांची खेळी केली.
धावफलक असा : वेस्ट इंडीज ५० षटकात ७ बाद १५३ धावा (मॅथ्यूज पायचित गो. गोस्वामी ६, क्युटेनी पायचित गो. पाण्डेय ९, टेलर त्रिफळा गो. बिश्ट १५, नाईट धावबाद १५, डॉटिन त्रिफळा गो. गोस्वामी ६३, ऍग्युलेईरा त्रिफळा गो. बिश्ट २५, कॅम्पबेल झे. बिश्ट गो. गायकवाड ५, फ्लेचर नाबाद ५, इतर धावा १०)
गडी बाद : १-१६, २-२०, ३-४५, ४-५८, ५-१२८, ६-१३९, ७-१५३.
गोलंदाजी : गोस्वामी १०-२-२८-२, पाण्डेय ७-०-१९-१, बिश्ट १०-२-२८-२, शर्मा १०-१-१९-०, गायकवाड १०-२-३१-१, कौर ३-०-२०-०
भारत ३८ षटकात ५ बाद १५४ धावा (मंधाना झे, डॉटिन गो. मॅथ्यूज ४४,  मैदानात अडथळा कामिनी २, शर्मा झे. मॅथ्यूज गो. मोहम्मद ३२, मिथाली राज झे. मॅथ्यूज गो. सेलमन ४५, कौर यष्टिचित गो. ऍग्युलेईरा गो. फ्लेचर ६, कृष्णमूर्ती नाबाद ८, पाण्डेय नाबाद १, इतर धावा १६).
गडी बाद : १-२३, २-८६,३-१११, ४-१२५, ५-१५०.
गोलंदाजी :
स्मार्त्झ १-०-१६-०, सेलमन ७-१-१८-१, टेलर ५-०-२०-०, मॅथ्यूज १०-१-२६-१, फ्लेचर ६-०-२२-१, मोहम्मद  ६-०-३१-१, डॉटिन ३-०-१९-०.

शेअर करा

Posted by on Nov 14 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google