Home » क्रीडा, छायादालन » भारत उपांत्य फेरीत

भारत उपांत्य फेरीत

=आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी=
indian-hockey-teamक्वांटन, [२६ ऑक्टोबर] – भारतीय पुरुष सिनिअर हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत आपले शानदार प्रदर्शन कायम राखत मंगळवारी तिसरा विजय नोंदवून उपांत्य फेरीत स्थान सुनिश्‍चित केले. भारताने एकतर्फी सामन्यात चीनचा सरळ ९-० गोलने धुव्वा उडविला. यापूर्वी भारताने जपान व पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरविले होते, तर दक्षिण कोरियाविरुद्धचा सामना बरोबरीत राहिला होा. भारताने चीनच्या खेळाडूंवर प्रारंभापासूनच आपले वर्चस्व गाजविले. चीनच्या खेळाडूंना चेंडूसाठी बराच संघर्ष करावा लागला. आकाशदीप सिंगने नवव्या मिनिटाला गोल नोंदवून भारताला आघाडी मिळवून दिली. चेंडू आकाशदीपकडे आला आणि त्याने शानदार रिव्हर्स हिट मारीत गोल नोंदविला. अफ्फान युसूफने भारतासाठी दुसरा गोल नोंदविला.  युसूफने १९ व्या मिनिटाला गोल केल्यानंतर तीन मिनिटांनी जसजीत सिंह कुल्लरने भारतासाठी तिसरा गोल केला. कर्णधार रूपिंदर पाल सिंगने २५ व्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरला गोलमध्ये परावर्तीत करून भारताची आघाडी ४-० अशी वाढविली. तिसर्‍या क्वॉर्टरमध्ये एस.के. उथप्पाने गोल नोंदविला. त्यांतर ३९ व्या मिनिटाला आकाशदीपने सहजपणे आपला दुसरा व संघाचा सातवा गोल नोंदविला. एका मिनिटांनी युसूफने आणखी एका गोलची भर घालून भारताची स्थिती ८-० अशी भक्कम केली. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये जसजीत सिंहने आपला दुसरा गोल नोंदवून भारताच्या विजयावर मोहोर लावली.
या विजयासोबतच भारत चार सामन्यातून तीन विजयाच्या आधारावर १० गुणांसह गुणालिकेत अव्वल स्थानावर आहे. मलेशिया तीन सामन्यात सर्व सामे जिंकून नऊ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.

शेअर करा

Posted by on Oct 27 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google