Home » छायादालन, प.महाराष्ट्र » मांगल्याचा महोत्सव आजपासून

मांगल्याचा महोत्सव आजपासून

diwali-of-lighting-wallpapersतभा प्रतिनिधी
सातारा, [दि. २५ ऑक्टोबर] – प्रकाश आणि चैतन्याचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाला बुधवारी वसुबारसेने प्रारंभ होत आहे. दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी बाजारपेठेत वसुबारसेला लागणार्‍या साहित्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती.
वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा मानला जातो. इतर सर्व सण उत्सवापेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल सर्वानाच आनंद देणारी असते. नरकचतुर्दशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा या तीन दिवसात नागरिकांनी गोडधोड खावे, आनंदी वातावरणात राहावे अशी बळीराजाची इच्छा आणि त्याला तसा मिळालेला वर यामुळे दिवाळीला विशेष महत्व आहे.
यंदा बुधवारी २६ रोजी दिवाळी सणाला वसुबारसने प्रारंभ होत आहे. या दिवशी सवत्स धेनू पूजनाचे महत्व असते. त्यानंतर शुक्रवारी २८ रोजी धनत्रयोदशी येत असून वस्त्रलंकाराची खरेदी शुभ मानली जाते. यादिवशी घरातील अलंकार व द्रव्याची पूजा केली जाते. शनिवारी २९ रोजी नरक चतुर्दशी असून या दिवशी पहाटे अभ्यंगस्नानाला महत्व असते. रविवारी ३० रोजी लक्ष्मीपूजन असून या दिवशी व्यापारी वहीपूजन, कुबेर पूजन केले जाते. यावेळी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्तश सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटे ते रात्री ९ वाजून १० मिनिटे तसेच ९.३० ते रात्री ११ यावेळेत आहे. सोमवारी ३१ रोजी बलिप्रतिपदा आहे. यादिवशी वहीपूजनाचा मुहूर्त पहाटे १.३५ ते ४ आणि पहाटे ५ ते सकाळी ८. १५  आणि सकाळी ९. ५० ते ११.२० यावेळेत आहे. दिवाळीचा शेवटचा दिवस मंगळवार १ नोव्हेंबर रोजी असून या दिवशी बहिणीने भावाला ओवाळणे हा मुख्य विधी असतो.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under छायादालन, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google