Home » क्रीडा, छायादालन » युवराज-हेजल अडकले विवाहबंधनात

युवराज-हेजल अडकले विवाहबंधनात

वृत्तसंस्था
चंदिगड, ३० नोव्हेंबर –

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज युुवराज सिंग आणि अभिनेत्री-मॉडल हेजल कीच बुधवारी चंदिगडपासून सुमारे ४० कि.मी. अंतरावरील फतेहगड साहिब गुरुद्वारा येथे विवाहबंधनात अडकले.
मंगळवारपासून त्यांच्या विवाह सोहळ्याला प्रारंभ झाला. मंगळवारी रात्री कोललित हॉटेलमध्ये मेहंदी व शगुन कार्यक्रम झाला. यावेळी संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात युवराज-हेजल सोबतच विराट कोहली आणि भारतीय संघाने खूप मौजमस्ती केली आणि पंजाबी गायक रंजीतबाबाच्या संगीताच्या तालावर नाचलेसुद्धा.
बुधवारी सकाळी मनसादेवी कॉम्प्लेक्सस्थित निवासस्थानी युवराजला हळद लागली.  युवराजने शेरवानी आणि मरुन रंगाची पगडी परिधान केली आणि माथ्यावर सेहरा बांधला होता. त्याने आपला हा फोटो सोशल मीडियावरसुद्धा शेअर केला.
दुपारी युवराज व हेजल आनंद कारजमध्ये सहभागी झाले. त्यानंतर ते फतेहगड साहिबच्या गुरुद्वारात विवाहबंधनात अडकले. त्याचदिवशी युवराजने इंग्लंड व भारतीय क्रिकेट संघासाठी रात्रभोज कार्यक्रम आयोजित केला. २ डिसेंबर रोजी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे गोवा येथे युवराज-हेजल यांचा विवाह होणार असून रात्री पार्टीचे आयोजन केले आहे. ३ डिसेंबर रोजी युवराजच्या गोवास्थित निवासस्थानी ब्रंचचे आयोजन केले आहे. ५ डिसेंबर रोजी दिल्लीत संगीत रजनी कार्यक्रम आणि ७ डिसेंबर रोजी दिल्लीतच स्वागत समारंभ होणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 30 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google