Home » क्रीडा, छायादालन » रूटपेक्षा कोहली अव्वल

रूटपेक्षा कोहली अव्वल

viratkohli_joerootनवी दिल्ली, [४ नोव्हेंबर] – आधुनिक क्रिकेटच्या शिलेदारांमध्ये भारताचा विराट कोहली आणि इंग्लंडचा जो रूट यांचे नाव आवर्जून घेतले जाते. अव्वल प्रतिस्पर्ध्याविरुद्ध, विविध वातावरणात सातत्याने धावा करण्याची या दोघांची हातोटी विलक्षण आहे. दमदार प्रदर्शनाच्या बळामुळेच कोहलीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर जो रूट इंग्लंडच्या फलंदाजीचा आधारस्तंभ झाला आहे. या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण याची चर्चा क्रिकेटरसिकांमध्ये रंगते. मात्र इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनने श्रेष्ठतम म्हणून रूटऐवजी कोहलीला पसंती दिली आहे. पीटरसनच्या मते या दोघांची तुलना करणे योग्य नाही. तो म्हणतो, कोहलीची आकडेवारी अद्भुत अशी आहे. त्याचे कामगिरीतील सातत्य अचंबित करणारे आहे. क्षमतेला साजेसे प्रदर्शन करण्यात तो वाकबगार आहे. तो इतक्या आक्रमकपणे गोलंदाजांवर हल्लाबोल करतो ते पाहणे विलोभनीय असते. प्रत्येक सामन्यात, मालिकेत तो धावांची टांकसाळ उघडतो. धावांचा पाठलाग करताना कोहलीची सरासरी पेक्षा अधिक आहे. काही दिवसांपूर्वी त्याला न्यूझीलंडविरुद्ध  धावांची खेळी साकारताना टीव्हीवर पाहिले. अवघड अशा खेळपट्टीवरची ती अफलातून खेळी होती. ज्या पद्धतीने तो स्ट्राइकची अदलाबदल करतो आणि शिताफीने चौकार वसूल करतो ते पाहणे रंजक आहे. कोहलीचे वय लहान आहे. मात्र त्याचा खेळण्यामागचा विचार अनुभवी खेळाडूला साजेसा आहे, असे मत पीटरसनने व्यक्त केले.

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google