Home » क्रीडा, छायादालन » रेश्माला सुवर्ण, सोनालीला रौप्यपदक

रेश्माला सुवर्ण, सोनालीला रौप्यपदक

=राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धा=
reshma-mane-gold-sonali-todkar-sliverसिंगापूर, [५ नोव्हेंबर] – राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या दोन महिला कुस्तीपटूंनी पदकांची कमाई केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही कुस्तीपटू महाराष्ट्रातील आहेत.
महाराष्ट्रातील मल्ल रेश्मा माने आणि मल्ल सोनाली तोडकर या महाराष्ट्राच्या लेकींनी सिंगापूरमधील राष्ट्रकुल स्पर्धेत पदके मिळविली आहेत. मल्ल रेश्मा माने हिने महिलांच्या ६३ किलो वजनी गटात सुवर्णपदक कमावलं आहे. रेश्मानं या स्पर्धेत सिंगापूरच्या चर्मायनी हुगीटिव्हाना आणि भारताच्याच गार्गी यादवला मात देत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
सिंगापूरमधील राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्याच सोनाली तोडकरने ५८ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत सोनालीला भारताच्या मंजूकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे सोनालीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
मूळची बीडची असलेली सोनाली पुण्यातील राजगुरुनगरमध्ये अश्‍विनी बोर्‍हाडे यांच्याकडे सराव करते, तर कोल्हापूरची रेश्मा माने राष्ट्रकुल कुस्ती संकुलात सराव करते. या दोघींच्या घवघवीत यशामुळे भारताच्या पारड्यात पहिल्याच दिवशी दोन पदके पडली आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google