Home » क्रीडा, छायादालन » सायना कोर्टवर चमकणार : विमलकुमार

सायना कोर्टवर चमकणार : विमलकुमार

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ डिसेंबर –
saina_1-01-12-2016भारताची ऑलिम्पिकपदक प्राप्त सायना नेहवाल हिच्यात येत्या ३-४ वर्षेपर्यंत दर्जेदार खेळ सादर करण्याचा आत्मविश्‍वास बळावला आहे असे मत सायनाचे प्रशिक्षक विमलकुमार यांनी व्यक्त केले. मकाउ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायनाने उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर ते मत मांडत होते.
याक्षणी सायना दुखापतीतून बरी झाल्यानंतर तंदुरुस्त असल्याचे दाखवत आहे. त्यासाठी तिची धडपड सुरू आहे. ढोर मेहनत घेत आहे. मकाउ खुल्या स्पर्धेत तिने स्पर्धेतील दोन फेर्‍या जिंकल्या आहेत. त्या विजयामुळे तिचा आत्मविश्‍वास बळावला आहे. तिचा प्रचंड आत्मविश्‍वास हा तिला कोर्टवर पुन्हा एकदा अव्वल स्थानाकडे नेणारा ठरू शकतो, या ऑल इंग्लंड विजेता व विश्‍व विजेता प्रकाश पादुकोणनंतर तिचे प्रशिक्षक विमलकुमार यांनी सायना विश्‍व अग्रस्थानावर पुन्हा झेप घेवू शकते असे भाकित वर्तविले आहे.
याक्षणी सायना आपल्या क्षमतेपेक्षा केवळ ६० टक्केच कौशल्य सादर करीत आहे. त्यामुळे सायनाच्या निकालावर अधिक लक्ष देण्यात येत नाही याकडे लक्ष वेधून विमलकुमार म्हणाले की, सायनाची जखम भरून निघत आहे. पण पूर्ण तंदुरुस्त होण्यास तिला अजून वेळ लागणार आहे. मोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी तिच्याजवळ कमी शक्ती, दम जाणवत आहे. येत्या तीन महिन्यात तिला शंभर टक्के तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागेल.
तिचा गुडघा आता बरा होत आहे. ही माझ्यासाठी आनंदाची बाब ठरत आहे. या काळातील स्पर्धेत ती केवळ सराव म्हणून बघत आहे याकडे लक्ष वेधून विमलकुमार म्हणाले की, सायना खेळत असताना तिला याक्षणी दुखापतीचा त्रास जाणवत नाही, ही जमेची बाजू होय.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google