Home » क्रीडा, छायादालन » सिंधूचे लक्ष मकाऊ ओपन जेतेपदावर

सिंधूचे लक्ष मकाऊ ओपन जेतेपदावर

वृत्तसंस्था
मकाऊ, २८ नोव्हेंबर –
pv-sindhu-ptiतीन वेळची विजेती आणि रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आपली विजयी घोडदौड कायम राखू इच्छित असून आता तिचे लक्ष मंगळवारपासून येथे प्रारंभ होणार्‍या मकाऊ ओपन ग्रां.प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर लागले आहे.
सिंधूने गत दोन आठवड्यात चायना ओपनमध्ये आपले पहिले सुपर सिरीज प्रिमियर विजेतेपद पटकावले आणि त्यानंतर हॉंगकॉंग सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. यात तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आता या स्पर्धेत
दुसरी सीड सिंधू विजेतेपदाची प्रबळ दावेदार असून ती बुधवारी चीनच्या यूई हानविरुद्ध आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे.
सिंधूच्या या चौथ्या विजेतेपदाच्या मार्गात तिची संघमैत्रीण व अव्वल सीड सायना नेहवाल अडसर ठरू शकते. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर सायना हळू-हळू प्रगतीच्या मार्गावर आहे. सायनाने चायना ओपनममधून पुनरागमन केले, परंतु सलामीच्या सामन्यातच ती पराभूत झाली. त्यानंतर तिने हॉंगकॉंग ओपन स्पर्धेत खेळली आणि ती उपांत्यपूर्व फेरीत हरली. माजी प्रथम विश्‍वमानांकित सायनाला या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या हॅन्ना रामादिनीविरुद्ध झुंज द्यायची आहे.
पुरूषांच्या गटात राष्ट्रीय विजेता समीर वर्मा याच्याकडून अपेक्षा असून अलीकडेच त्यांनी हॉंगकॉंग ओपनमध्ये उपविजेतेपद मिळविले. त्याला पहिल्या फेरीत झेक प्रजासत्ताकच्या लिन लुडिकविरुद्ध खेळायचे आहे. डेन्मार्क ओपननंतर विश्रांती घेणारा पी. कश्यप या स्पर्धेत आव्हान देणार असून त्याची गाठ मलेशियाच्या गुओ झेंग सिमशी पडणार आहे. सिमविरुद्ध विजय नोंदविला तर कश्यपला त्याचा संघमित्र व सातवा सीड एच.एस. प्रणोयविरुद्ध खेळावे लागेल. प्रणोयची पहिली झुंज चीन तायपेईच्या चून वेई चेनविरुद्ध होणार आहे. सिरा सीड श्रीकांतला बाय मिळाला, तर बी. साई प्रणितला स्थानिक खेळाडू लाम होऊ हिमविरुद्ध खेळायचे आहे.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google