Home » क्रीडा, छायादालन » सिंधू जिंकली, सायना हरली

सिंधू जिंकली, सायना हरली

=चायना सुपर सिरीज बॅडमिंटन=
वृत्तसंस्था
फूझो, १६ नोव्हेंबर –
saina_sindhuभारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या विजयासह पुनरागमनाच्या आशेवर पाणी फेरल्या गेले. चायना सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत सायनाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधूने पहिल्या फेरीत विजय नोंदविला.
अवघ्या ३४ मिनिटांच्या या लढतीत सिंधूने चीन तायपेईच्या चिया सिन ली हिला २१-१२, २१-१६ असा सहज विजय नोंदविला. आता सिंधूचा सामना अमेरिकेच्या बिवेन जांगशी होणार आहे.
दुखापतीमुळे तीन महिन्यानंतर कोर्टवर पुनरागमन करणार्‍या सायनाला थायलंडच्या पोर्नतिपकडून पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. सुमारे एक तास चाललेल्या सामन्यात पोर्नतिपने सायनाला १६-२१, २१-१९, १४-२१ असे पराभूत केले. यापूर्वी सायना तिच्याकडून नऊ वेळा हरलेली आहे. आता सायना पुढील आठवड्यात हॉंगकॉंग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत खेळणार आहे.
पुरुष गटात अजय जयराम व एचएस प्रणय या दोघांनीही आपापल्या पहिल्या फेरीचे सामने जिंकून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google