Home » क्रीडा, छायादालन » हार्दिक पांड्याला संधी, ईशांतचे पुनरागमन

हार्दिक पांड्याला संधी, ईशांतचे पुनरागमन

♦इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी संघाची घोषणा
♦दुखापतीमुळे रोहित, शिखर बाहेर, गंभीरचे स्थान कायम,
hardik_मुंबई, [२ नोव्हेंबर] – इंग्लंडविरुद्ध ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार्‍या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघात अष्टपैलू हार्दिक पांड्या या एकमेव नवीन चेहर्‍याला तसेच चिकनगुनिया आजारातून बरा झालेल्या वरिष्ठ वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला स्थान देण्यात आले आहे.
के.एल. राहुल, शिखर धवन व रोहित शर्मा दुखापतीमुळे संघात स्थान मिळवू शकले नाही, तर भुवनेश्‍वर कुमारसुद्धा अद्याप दुखापतीतून सावरला नाही. हा संघ पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी निवडण्यात आला आहे. गौतम गंभीरने संघात स्थान कायम राखले आहे आणि ईशांत शर्माने संघात पुनरागमन केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून प्रदीर्घ काळ दूर राहिल्यानंतर गंभीरने इंदूरमध्ये झालेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावले.
भारतीय संघात हार्दिक पांड्या, करुण नायर व जयंत यादवचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ राजकोट येथे ५ नोव्हेंबरपासून सरावाला सुरूवात करणार आहे.
हार्दिक पांड्याच्या निवडीसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद म्हणाले की, हार्दिक पांड्यामध्ये अष्टपैलू प्रदर्शन करण्याची क्षमता आहे. भारतीय अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या पांड्यामध्ये कमालीचे परिवर्तन झालेले आहे. त्याच्या गोलंदाजीचा वेगसुद्धा वाढलेला आहे. एकूणच त्याच्या व्यक्तिमत्वात बदल झाला आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आणि भारतीय अ संघाच्या दौर्‍यातसुद्धा त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. तो अष्टपैलू प्रदर्शन करणार्‍या वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. कपिल देवनंतर आम्ही त्याच्यातील अष्टपैलू खेळाडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहो, असेही ते म्हणाले.
जर आम्ही तीन फिरकी गोलंदाजांनिशी खेळणार असेल, तर पांड्या हा दुसरा वेगवान गोलंदाज राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंदूर येथील अखेरच्या कसोटीत सामन्यात राखीव म्हणून ठेवण्यात आलेल्या करुण नायरविषयी विचारले असतो प्रसाद म्हणाले की, गत एक-दोन वर्षांपासून आमच्या त्याच्याकडे लक्ष आहे.
भारतीय क्रिकेट संघ असाः-
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, गौतम गंभीर अजिंक्य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा, करुण नायर, हार्दिक पांड्या, रिद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, उमेश यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी व जयंत यादव.
भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेट मालिकेचा कार्यक्रम
९ ते १३ नोव्हेंबर, राजकोट येथे पहिला सामना.
१७ ते २१ नोव्हेंबर, विशाखापट्टणम येथे दुसरा सामना.
२६ ते ३० नोव्हेंबर, मोहाली येथे तिसरा सामना.
८ ते १२ डिसेंबर, मुंबई येथे चौथा सामना.
१६ ते २० डिसेंबर, चेन्नई येथे पाचवा व अंतिम सामना.

शेअर करा

Posted by on Nov 3 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google