Home » क्रीडा, छायादालन » हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन सायनाचा पहिला विजय

हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन सायनाचा पहिला विजय

वृत्तसंस्था
कोलून, २३ नोव्हेंबर –
saina-nehwal2पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या सायना नेहवालने हॉंगकॉंग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या पहिल्या फेरीचा सामना जिंकला. तिने थायलंडच्या पोर्नतिप बुरानप्रासेरत्सुकला हरवून दुसर्‍या फेरीत धडक मारली.
लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायनाला चायना ओपनच्या पहिल्या फेरीत पोर्नतिपने हरविले होते. दुखापतीमुळे तीन महिन्यानंतर पुनरागमन करीत असलेल्या सायनाने त्या पराभवाचा वचपा काढला. तिने १२ वी विश्‍वमानांकित बॅडमिंटनपटू थायलंडच्या पोर्नतिपला १२-२१, २१-१९, २१-१७ असे हरविले. पाचवी सीड सायनाचा सामना आता चियांग मेइ हुइ व जपानची सायाका सातो यांच्यातील लढतीतील विजयी खेळाडूशी होईल.
पुरुष एकेरीत स्विस ओपन विजेता एच.एस. प्रणयने चीनच्या कियाओ बिनला २१-१६, २१-१८ असे पराभूत केले, तर राष्ट्रीय विजेता समीर वर्माने जपानच्या ताकुमा उएडाला २२-२०, २१-१८ अशी मात दिली. पुरूष दुहेरीत मनु अत्री व बी. सुमित रेड्डीला कोरियाच्या सोल्ग्यू चोइ व को सुंग ह्यूनकडून १५-२१, ८-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला.
यापूर्वी दुखापतीनंतर पुनरागमन करणार्‍या सायनाला पहिल्या फेरीच्या संघर्षपूर्ण लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता, हे येथे उल्लेखनीय. सायनाला पोर्नतिपकडून १६-२१, २१-१९, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला.

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google