Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » अखिलेशची विकास यात्रा दिवाळखोरीचे प्रतीक

अखिलेशची विकास यात्रा दिवाळखोरीचे प्रतीक

=मायावती यांची टीका=
mayawati11लखनौ, [४ नोव्हेंबर] – मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची विकास रथ यात्रा दिवाळखोरीचे प्रतीकच आहे. सपा सरकारने जनतेच्या कल्याणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असते, तर सरकारी तिजोरीची उधळपट्टी करून अशी यात्रा करण्याची गरजच सरकारला भासली नसती, अशी टीका बसपा नेत्या मायावती यांनी केली.
कोणत्याही सरकारने केलेले काम हेच त्यांच्या यशाची पावती असते. लोकांना विकास कामे दिसल्यानंतर त्याविषयी बोलण्याची गरजच भासत नाही. पण, जेव्हा एखादे सरकार जनतेच्या हितात एकही काम करीत नसते, तेव्हा त्यांच्यावर अशा प्रकारची विकास रथ यात्रा काढण्याची वेळ येते, असे मायावती यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
अखिलेश यांच्या हायटेक रथात सुरुवातीच्याच टप्प्यात बिघाड निर्माण झाला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रथाने अखिलेश यांच्या दिवाळखोरीचे दर्शनच घडवले आहे. अखिलेश व शिवपाल समर्थक यात्रेच्या संपूर्ण मार्गांत एकमेकांवर तुटून पडत होते आणि पोलिस मूक प्रेक्षक बनून हा सर्व तमाशा पाहात होते, असेही त्यांनी यात नमूद केले.
आपल्या सरकारने राज्यात विकासाची मोठमोठी कामे केली असल्याचा दावा अखिलेश यादव करीत असले, तरी प्रत्यक्षात एकही विकास काम न झाल्याने जनता या सरकारवर नाराज आहे. सरकारने केवळ विकासाच्या घोषणा केल्या, काम केले नाही, अशीच लोकांची तक्रार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google