Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » अखिलेशच्या विकास रथयात्रेला गालबोट

अखिलेशच्या विकास रथयात्रेला गालबोट

♦अखिलेश-शिवपाल समर्थकात हाणामारी
♦खुर्च्यांची फेकाफेकी
♦‘हायटेक’ रथ एक किमी अंतरावर बंद!,
akhilesh-yadavलखनऊ, [२ नोव्हेंबर] – मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात गाजावाजा करीत सुरू केलेल्या  विकास रथ यात्रेला पहिल्या दिवशीच आज गुरुवारी गालबोट लागले. सपा प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी हिरवा झेंडा दाखवताच रथयात्रा प्रारंभ झाली. अवघ्या  एक किमीच्या अंतरानंतर कापताच अखिलेश यांचा ‘मर्सिडीज बेंझ’ रथ बंद पडला. या कार्यक्रमापूर्वी सपा प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समर्थक एकमेकांसोबत भिडले. दोन्ही गटांत हाणामारीही झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्याही फेकल्या. अखेर पोलिसांना बळाचा वापर करून जमावाला पांगवावे लागले.
अखिलेश यादव यांच्या बंद पडलेल्या रथाची चर्चा सर्वत्र रंगली होती. या  हायटेक रथासाठी तब्बल पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रथयात्रा कार्यक्रमाला सपाचे प्रमुख मुलायमसिंह यादव उपस्थित राहतील का, या विषयी विविध तर्क व्यक्त होत होते. मात्र मुलायम सिंह आणि  प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी एकत्र उपस्थित राहून ‘आम्ही एकत्र आहोत’ असा ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हे समाजवादीचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन यावेळी  शिवपाल यादव यांनी केले. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन  करू, असा विश्‍वास यावेळी अखिलेश यादव यांनी व्यक्त केला.
समाजवादी पक्षात अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्या संघर्ष सुरू आहे. अखिलेश यांनी शिवपाल यादव यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविला होता, तर शिवपाल यादव यांनी अखिलेश समर्थकांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कौटुंबिक कलह  उफाळल्याने या कार्यक्रमाच्या निमित्ताने यादव परिवार एकत्र येणे, हा औत्सुक्याचा विषय होता.

शेअर करा

Posted by on Nov 4 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google