Home » ठळक बातम्या, सोलापूर » अध्यात्मामध्ये नारदभक्ती सूत्र महत्वाचे: विवेक घळसासी

अध्यात्मामध्ये नारदभक्ती सूत्र महत्वाचे: विवेक घळसासी

=विवेकाची अमृतवाणीला प्रारंभ=
vivek-ghalsasi-amrutwaniसोलापूर, (प्रतिनिधी) :- नारदभक्ती सूत्राला आध्यात्मामध्ये महत्वाचे मानले जाते म्हणूनच भक्ती अनुभवरूप आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले. दिपावलीपूर्व बौध्दिक मेजवानी असलेल्या विवेकाची अमृतवाणी या प्रवचन मालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.
निसर्गामध्ये, पर्यावरणामध्ये जशी संवदेनशीलता असते तशीच संवेदनशीलता भक्तीमध्ये असली पाहिजे.भक्ती अनुभवरूप आहे. भक्ती साधनकालीन अमृतमयी आहे. ८४ सूत्रामध्येच नारद भक्तीचे सूत्र आहे. प्रतिक्रियेपेक्षा प्रतिसादाची आवश्यकता आहे त्यातूनच मनुष्याचा विकास होतो. आयुष्यात येणारे दुखः हे संकट नसून तर ती परिक्षा असते. जन्मतःच राम आणि मृत्यु समयी राम असे म्हणार्‍याच्या संपूर्ण आयुष्यात वाईट काय घडणार असेही निरूपणकार विवेक घळसासी यांनी सांगितले. दिपोत्सवाच्या पूर्व संध्येला आनंददायी पर्वाची सुरूवात म्हणून गेल्या ८ वर्षापासून विवेकाची अमृतवाणी या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूर, रंगकर्मी प्रतिष्ठान आणि आर्यन क्रिएशन सोलापूर यांच्या वतीने ऍम्फी थिएटरमध्ये सकाळी ६.३५ वा. आयोजित करण्यात आलेल्या विवेकाची अमृतवाणी या प्रवचन मालेत यंदा रामप्रहरी भक्ती सरोवरातीरी या विषयावर नारद भक्तीसूत्रावरील विवेचनाचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. शनिवार दि. २२ ऑक्टोंबर या प्रवचनमालेचा दुसरा दिवस आहे. तर रविवार दि. २३ ऑक्टोबर रोजी समारोप होणार आहे.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under ठळक बातम्या, सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google