Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अनुदानित गॅस सिलेंडर महागले

अनुदानित गॅस सिलेंडर महागले

=विमानाच्या इंधनातही वाढ=
gas_cylinderनवी दिल्ली, [१ नोव्हेंबर] – विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत सोमवारी मोठी वाढ केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज मंगळवारी अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत दोन रुपयांची वाढ केली आहे. तसेच विमानाला लागणार्‍या इंधनाच्या किमतीतही ७.३ टक्क्यांनी वाढ जाहीर केली. हे नवे दर आज मध्यरात्रीपासूनच अंमलात आले आहेत.
अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्याची मागील पाच महिन्यांतील ही सहावी वेळ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार आम्ही ही दरवाढ केली असल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या एका अधिकार्‍याने सांगितले. यापूर्वी २८ ऑक्टोबर रोजी अनुदानित सिलेंडरच्या किमतीत दीड रुपयांची वाढ करण्यात आली होती. तेल कंपन्यांनी सोमवारी विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत ३८.५० रुपयांची वाढ केली होती.
विमानाला लागणार्‍या इंधनाच्या प्रती किलोलिटर किमतीत ३४३४.२५ रुपयांची वाढ करण्यात आल्याने विमान कंपन्यांना आता प्रती किलोलिटर इंधनासाठी ५०,२६०.६३ रुपये मोजावे लागणार असून, याचा परिणाम विमान प्रवास महाग होण्यावर होऊ शकतो, असे सूत्रांचे मत आहे.

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google