Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » अयोध्या प्रश्‍नी हस्तक्षेपाची श्री श्रींची तयारी

अयोध्या प्रश्‍नी हस्तक्षेपाची श्री श्रींची तयारी

sri-sri-ravi-shankarjiहैदराबाद, [६ नोव्हेंबर] – अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादावर न्यायालयाबाहेर शांततापूर्ण वातावरणात तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी दर्शवली आहे.
राम मंदीर मुद्यावर समाधानकारक तोडगा निघणे आवश्यक आहे आणि यासाठी मध्यस्थी करण्यास आपण तयार आहोत, असे श्री श्रींनी शनिवारी हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांना सांगितले.
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपाने राम मंदिर मुद्याचा आधार घ्यायलाच हवा. मंदिराचा मुद्दा सोडल्यास भाजपा कदापि सत्तेत येऊ शकणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पृष्ठभूमीवर रविशंकर यांनी दोन्ही देशातील लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. पाकमधील चार शहरात आर्ट ऑफ लिव्हिंगची केंद्रे आहेत. यापूर्वी पाकच्या विविध भागांमध्ये महापुराचे संकट ओढवले असता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली होती. पाकमधील ३०० ते  ४०० लोक दरवर्षी बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या केंद्रात येतात, याकडेही त्यांनी  लक्ष वेधले.

शेअर करा

Posted by on Nov 7 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google