Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अर्णवपाठोपाठ जाहिरातदारांचीही टाईम्स नाऊकडे पाठ

अर्णवपाठोपाठ जाहिरातदारांचीही टाईम्स नाऊकडे पाठ

arnab-goswamiनवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] – अर्णब गोस्वामींनी काही दिवसांपूर्वी टाईम्स नाऊच्या संपादक पदाचा राजीनामा दिला. अर्णब गोस्वामी यांचा न्यूजअवर हा प्राईम टाईममधील कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आणि वादग्रस्त आहे. त्यामुळे आता अर्णब गोस्वामी यांच्या राजीनाम्यानंतर या कार्यक्रमाचे काय होणार, हा प्रश्‍न आहे. यासोबत अर्णब यांच्या राजीनाम्यामुळे वृत्तवाहिनीसमोर काही आर्थिक प्रश्‍नदेखील उभे राहिले आहेत.
टाईम्स नाऊ सोबत केलेल्या कंत्राटांचा जाहिरातदारांकडून पुनर्विचार सुरू आहे. टाईम्स नाऊकडून जाहिरातीसाठी आकारल्या जाणार्‍या दरांचादेखील पुनर्विचार व्हावा, असेही जाहिरातदारांकडून सांगण्यात आले आहे. न्यूजलॉण्ड्री संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, अर्णव यांच्या दोन तासांच्या प्राईम टाईममधील कार्यक्रमातून वृत्तवाहिनीला एकूण ४० टक्के उत्पन्न मिळते. अर्णव यांच्या न्यूजअवर कार्यक्रमातून वर्षाकाठी १२० कोटींचे उत्पन्न मिळते. न्यूजअवरमधून होणार्‍या उत्पन्नाचा आकडा १५० कोटींपर्यंतदेखील पोहोचला आहे, अशी माहिती टाईम्स नेटवर्कचे सहायक लेखा संचालक अखिल महाजन यांनी दिली.
टाईम्स नाऊसोबत अनेक कंपन्यांनी ऑगस्ट २०१७ पर्यंतचा करार केला आहे. न्यूजअवर दरम्यानच्या १० सेंकदांच्या जाहिरातीचा दर  ३५ हजार रुपये इतका आहे. ही सर्वाधिक कमी किंमत आहे. यामध्ये कार्यक्रमानुसार वाढ होते. हुंडाई आणि पतंजली या कंपन्यांनी टाईम्स नाऊ सोबत वर्षभराचा करार केला आहे. अर्णव गोस्वामी नोव्हेंबरपर्यंत टाईम्स नाऊ सोबत असतील, असे सांगितले जाते. मात्र त्यांचा करार डिसेंबरपर्यंत आहे.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google