Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » अलाहाबाद हायकोर्ट परिसरात सापडली स्फोटकांची पिशवी

अलाहाबाद हायकोर्ट परिसरात सापडली स्फोटकांची पिशवी

=दोन कच्चे बॉम्ब निकामी=
allahabad-high-courtअलाहाबाद, [२८ ऑक्टोबर] – कडेकोट बंदोबस्त असूनही अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरात काल रात्री स्फोटक पदार्थांनी भरलेली एक प्लॅस्टिकची पिशवी आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली.
हायकोर्टच्या कोर्ट रूम क्रमांक ५५ मध्ये ही बॅग आढळली. सदर बॅग उघडून पाहता, त्यात कमी तीव्रतेचे कच्चे बॉम्ब, फटाके व धातूचे तुकडे भरलेले होते. या स्फोटकांमुळे कोणतीही मोठी हानी होणार नव्हती. खोडसाळपणा करावा म्हणून कुणीतरी ही पिशवी आणून ठेवली असावी, असे अधिकार्‍याने सांगितले.
कोर्टरूममध्ये एका कर्मचार्‍याला सदर पिशवी दिसताच त्याने पिशवीविषयी पर्यवेक्षकांना तत्काळ माहिती दिली. त्यानंतर लगेच जिल्हा सत्र न्यायधीश संजय कुमार, वरिष्ठ पोलिस अधीक्षक शलभ माथुर व वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी घटनास्थळावर पोहोचले.
बॉम्ब निकामी करणारे पथकसुद्धा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सदर पिशवी कोर्टरुमच्या बाहेर नेऊन त्यातील स्फोटक पदार्थ निष्प्रभ केले.
हायकोर्टचा परिसर विस्तीर्ण असून, येथे कडेकोट बंदोबस्त असतो. सुमारे १५० पोलिसांचा आळीपाळीने चोवीस तास पहारा असतो. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने कोर्ट परिसरात विविध कोपर्‍यात २१० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. सीआरपीएफची एक तुकडीसुद्धा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली आहे, असेही या अधिकार्‍याने सांगितले.
सर्व स्फोटके न्यायिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. कोर्ट परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेशास बंदी आहे. याच परिसरात स्टेट बँक ऑफ इंडिया व पोस्ट ऑफिस आहे, त्यामुळे विशेष प्रवेशपत्राच्या आधारावरच सर्वसामान्यांना कोर्ट परिसरात प्रवेश दिला जातो.

शेअर करा

Posted by on Oct 29 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google