Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » अश्विनी एकबोटे यांचे रंगमंचावरच निधन

अश्विनी एकबोटे यांचे रंगमंचावरच निधन

ashwini-ekboteहिंदुस्थान समाचार,
पुणे, [२२ ऑक्टोबर] – प्रसिद्ध अभिनेत्री, रंगकर्मी अश्विनी एकबोटे यांचे आज शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पुण्यातील भरत नाट्यमंदिरात ‘नाट्यत्रिविधा’च्या प्रयोगादरम्यान मंचावरच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याचे समजते. त्या मूळच्या सोलापूरच्या होत. भाजपा नेते विश्‍वनाथ बेंद्रे यांच्या त्या जवळच्या नातेवाईक होत.
पुण्यातील भरत नाट्यमंदिरात ‘नाट्यत्रिविधा’ या नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच अश्विनी एकबोटे यांना मृत्यूने गाठले. नाटकाच्या प्रयोगातील एका गाण्यावर त्यांनी नृत्य सादर केले. रात्री ८.१५ च्या सुमारास त्या कार्यक्रमातील शेवटचे नृत्य सादर करण्यासाठी रंगमंचावर आल्या. भैरवी रागावर आधारित बंदिशीवर त्यांनी नृत्य करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या सहजसुंदर नृत्याला प्रेक्षकांनीही दाद दिली. नृत्य सादर करुन झाल्यावर त्या अखेरच्या क्षणी तोल जाऊन रंगमंचावर कोसळल्या. त्यांनी त्वरित पेरुगेटजवळील गोरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
‘असंभव’, ‘कशाला उद्याची बात’, ‘राधा ही बावरी’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘दुर्वा’ या मालिका, ‘हायकमांड’, ‘बावरे प्रेम हे’, ‘क्षण हा मोहाचा’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या. याशिवाय त्यांनी ‘एका क्षणात’, ‘त्या तिघांची गोष्ट’ अशा काही दर्जेदार नाटकांमधूनही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. सध्या त्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘गणपती बाप्पा मोरया’ या मलिकेतील रावणाच्या आईची भूमिका साकारत होत्या. मराठी चित्रपट व मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली होती. त्यांच्या निधनाच्या अचानक आलेल्या वृत्ताने दूरचित्रवाणी मालिका व नाट्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google