Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » अस्थायी कर्मचारीही समान काम, समान वेतनास पात्र

अस्थायी कर्मचारीही समान काम, समान वेतनास पात्र

♦सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
♦अधिकार नाकारणे म्हणजे श्रमाचे शोषणच,
supreme_court_1नवी दिल्ली, [२९ ऑक्टोबर] – नियमित कर्मचारी ज्या पद्धतीचे काम करतात, तेच काम जर रोजंदारी कामगार, आकस्मिक आणि कंत्राटी कामगार करीत असतील, तर समान काम-समान वेतन हा सिद्धांत या कर्मचार्‍यांसाठीही लागू होतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे देशातील लाखो अस्थायी कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
समान कामासाठी समान वेतन नाकारणे हा प्रकार कर्मचार्‍यांचे शोषण आणि अन्याय करणारा तसेच दडपशाहीचा आहे, असे स्पष्ट करताना एका विकसनशील राष्ट्रात अस्थायी कर्मचार्‍यांकरिता देखील हा सिद्धांत लागू करायलाच हव, असे न्या. जे. एस. खेहार आणि न्या. शरद बोबडे यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने शुक्रवारी या प्रकरणी दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना दिले.
या मुद्यावर आमचे असे स्पष्ट मत आहे की, नियमित कर्मचार्‍यांप्रमाणेच काम करणार्‍या अस्थायी कर्मचार्‍यांना त्यांच्या परिश्रमाचे फळ नाकारण्यासाठी कृत्रिम निकषांचा आधार घेणे चुकीचे आहे. एकसारखेच काम करणार्‍या अस्थायी कर्मचार्‍याला नियमित कर्मचार्‍याच्या तुलनेत कमी वेतन देता येणार नाही. ही बाब देशाच्या हितातही नाही. अशा प्रकारची कृती त्या कर्मचार्‍याच्या कामाचे मूल्य कमी लेखणारी आणि मानवी प्रतिष्ठेवर आघात करणारी आहे, असेही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.
एखादा अस्थायी कामगार जर नियमित कर्मचार्‍यापेक्षाही कमी वेतनावर तेवढेच काम आणि जबाबदारी पार पाडत असेल, तर तो स्वेच्छेने तसे करीत आहे, असा अर्थ मुळीच नाही. आपल्या कुटुंबीयांच्या अन्न व निवार्‍यासाठी तसे करणे त्याची अपरिहार्यता असते. यासाठी तो स्वत:चा सन्मान आणि प्रतिष्ठा देखील पणाला लावत असतो, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.
आपण जर कमी पगारावरील काम स्वीकारले नाही, तर आपल्या कुटुंबाला त्याचा फार मोठा धक्का बसेल, याची जाणीव त्याला असते. त्यामुळे नियमित कर्मचार्‍याला ज्या कामासाठी जितके वेतन दिले जाते, त्यापेक्षा कमी वेतन तेवढेच काम करणार्‍या अस्थायी कर्मचार्‍याला नाकारण्यात आले, तर त्याला गुलामगिरीची जाणीव करणारी आणि त्याच्या परिश्रमाचे शोषण करणारीच ती कृती ठरेल. व्यवस्थापन किंवा मालकांची दडपशाही प्रवृत्ती यातून दिसून येईल, असेही न्यायालयाने निकालात स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google