Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » आंतरराष्ट्रीय विधि आयोगात अनिरुद्ध राजपूत

आंतरराष्ट्रीय विधि आयोगात अनिरुद्ध राजपूत

=भारताचा प्रथमच प्रवेश=
aniruddha-rajputसंयुक्त राष्ट्रसंघ, [४ नोव्हेंबर] – भारतातील सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे ३३ वर्षीय ऍड. डॉ. अनिरुद्ध राजपूत यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर सदस्य म्हणून निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर सदस्य म्हणून निवड होणारे ते पहिलेच भारतीय आहेत, हे विशेष. त्यांच्या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय विधि आयोगात भारताचा प्रथमच प्रवेश झाला आहे.
राजपूत हे आशिया-पॅसिफिक गटातून सवार्र्धिक मते मिळवून विजयी झालेत. गुप्त मतदान पद्धतीने ही निवड करण्यात आली. आफ्रिका, आशिया-पॅसिफिक, पूर्व युरोप, लॅटिन अमेरिका आणि पश्‍चिम युरोप या पाच गटातून ३४ सदस्यांची आयोगावर निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सदस्यांचा कालावधी पाच वर्षांचा आहे. आशिया-पॅसिफिक गटामधून राजपूत यांना १६० मते प्राप्त झालीत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी येथे दिली.
ऍड. डॉ. अनिरुद्ध राजपूत हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी असून त्यांनी कायदेविषयक विविध पुस्तकांचे लेखन केले आहे. भारतीय विधि आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
काय आहे आतंरराष्ट्रीय विधि आयोग?
आंतरराष्ट्रीय विधि आयोग ही संयुक्त राष्ट्रसंघाची कायदाविषयक सर्वोच्च संस्था आहे. आयोगाचे कामकाज जिनेव्हा येथील मुख्यालयातून चालते. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या निरंतर विकासाची जबाबदारी विधि आयोगाकडे आहे.

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google