Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » आंतरराष्ट्रीय सौर करारावर २० देशांच्या स्वाक्षर्‍या

आंतरराष्ट्रीय सौर करारावर २० देशांच्या स्वाक्षर्‍या

♦ब्राझिल, फ्रान्सचा समावेश
♦पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराला मोठे यश,
वृत्तसंस्था
मर्राकेच, १६ नोव्हेंबर –
narendramodi-pmपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यातून साकारलेल्या आंतरराष्ट्रीय सौर अलायन्सच्या मसुदा करारावर ब्राझिल आणि फ्रान्ससह एकूण २० देशांनी स्वाक्षरी केली आहे. सौर ऊर्जेच्या वापरासाठी जगाला प्रेरित करण्याच्या पंतप्रधानांच्या पुढाकाराचे हे आणखी एक मोठे यश मानले जात आहे.
‘कॉप-२२’ परिषदेच्या अनुषंगाने मंगळवारी आंतरराष्ट्रीय सौर अलायन्सचा मसुदा करार स्वाक्षरी करण्यासाठी सादर करण्यात आला. यावेळी बोलताना पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे म्हणाले की, कराराची कायदेशीर चौकट अस्तित्वात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर अलायन्स हे भारत देश प्रमुख आंतरराष्ट्रीय मुख्यालय होणार आहे.
करारावर स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अतिशय कमी वेळात तब्बल २० देशांनी त्यावर स्वाक्षरी केली, अशी माहिती पर्यावरण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने  दिली. भारतातील पर्यावरण तज्ज्ञांनी ही अतिशय चांगली आणि सकारात्मक सुरुवात असल्याचे म्हटले आहे. विकसनशील देशांमध्ये सौर ऊर्जेचा दर्जा उंचाावून किंमत कमी करताना, सौर ऊर्जेची मागणी वाढविण्यासाठी हा करार अतिशय आवश्यक आहे. तथापि, या कराराचे मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशांचा या करारावर संपूर्ण विश्‍वास असायलाच हवा, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला.
वातावरण बदलावरील ‘कॉप-२२’ परिषद आयोजित करण्यात आली आहे. याच अनुषंगाने हा करारही सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी पॅरिस येथे आयोजित ‘कॉप-२१’ परिषदेत पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा होलंड यांनी सौर ऊर्जा कराराची संकल्पना सादर केली होती. यावेळी सुमारे ७० देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी या संकल्पनेचे स्वागत केले होते.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google