Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » आणखी एक भारतीय व्हाईट हाऊसमध्ये!

आणखी एक भारतीय व्हाईट हाऊसमध्ये!

=ट्रम्प यांनी घेतली संदीप माथराणींची भेट=
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, २९ नोव्हेंबर –
sandeep-mathraniअमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रियल इस्टेट उद्योगातील आघाडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अनिवासी भारतीय संदीप माथराणी यांची भेट घेतली. आपल्या नव्या मंत्रिमंडळात माथराणी यांनाही सहभागी करण्याचा ट्रम्प यांचा विचार असल्याची माहिती आहे.
अमेरिकेतील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या जनरल ग्रोथ प्रॉपर्टीजचे ५४ वर्षीय माथराणी हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ट्रम्प यांच्याकडून भेटीचे निमंत्रण आल्यानंतर माथराणी यांनी न्यूयॉर्क येथील ट्रम्प टॉवर्समध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या शिकागो शहरातच माथराणी यांचेही वास्तव्य आहे.
संदीप माथराणी यांचा ट्रम्प मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनीही दिले आहे शिकागो येथील व्यावसायिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, माथराणी यांनी गेल्या वर्षी ३९.२ दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळवले होते. अमेरिकेच्या रियल इस्टेट उद्योगातील कोणत्याही मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या कमाईच्या तुलनेत माथराणी यांचे उत्पन्न फार जास्त आहे.

शेअर करा

Posted by on Nov 29 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google