Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आताच शाई लावाल, मग निवडणुकीत काय करायचे?

आताच शाई लावाल, मग निवडणुकीत काय करायचे?

=निवडणूक आयोगाचे केंद्रीय अर्थमंत्रालयाला पत्र=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर –
election-commission-of-india-logoनोटाबंदीच्या निर्णयानंतर आपल्याजवळील ५०० व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेत येणार्‍या ग्राहकांच्या बोटांवर आता शाई लावली जाऊ नये. कारण पुढील वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे आता जर आपण नागरिकांच्या बोटावर शाई लावली, तर मतदानाच्या काळात काय करायचे, अशी विचारणा करणारे पत्र निवडणूक आयोगाने केंद्रीय अर्थमंत्रालयाला लिहिले आहे.
अनेक लोक आपल्याजवळील पैसा बदलण्यासाठी दिवसातून अनेकदा बँकांमध्ये जात असल्याचे लक्षात आल्यानंतर यावर आळा घालण्यासाठी देशातील सर्व बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी येणार्‍या ग्राहकांच्या बोटावर मतदानाप्रमाणे शाई लावण्यात येत आहेत. केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केला होता.
आगामी काळ काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा आहे. त्यातच बोटावर लागलेली शाई लवकर मिटत नसल्याचाही अनुभव आहे. त्यामुळे आयोगाची चिंता वाढली आहे. आता जर आपण नागरिकांच्या बोटावर शाई लावली, तर निवडणुकीत मतदान करण्यासाठी येणार्‍या मतदारांच्या बोटावर शाई कशी लावायची, असा प्रश्‍न उपस्थित करून, शाई लावण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी विनंती आयोगाने अर्थमंत्रालयाला पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 19 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google