Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आता बेहिशेबी मालमत्ता केंद्राच्या रडारवर

आता बेहिशेबी मालमत्ता केंद्राच्या रडारवर

♦काळ्या पैशाविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक-२
♦राष्ट्रीय महामार्गांवरील जमिनींचीही चौकशी,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर –
india-cityदेशातील काळा पैसा कचरा ठरविण्यासाठी तसेच अतिरेक्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ नोव्हेंबर रोजी आगळीच सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर आता याच स्ट्राईकचा भाग-२ हाती घेण्याची तयारी सरकारने केली आहे. केंद्र सरकारच्या रडारवर आता बेहिशेबी मालमत्ता आहे. देशातील मोक्याच्या ठिकाणी आणि राष्ट्रीय महामार्गांना लागून असलेल्या जमिनी व अन्य मालमत्तांची चौकशी सुरू झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गांवर अनेक बड्या व्यावसायिकांनी आणि अमाप काळा पैसा असणार्‍यांनी दुसर्‍यांच्या नावांवर जमिनी, शेती व अन्य मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत. या सर्वच मालमत्तांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पथके गठित केली आहेत, अशी माहिती या घडामोडीशी संबंधित असलेल्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
देशातील प्रमुख शहरांमधील राष्ट्रीय महामार्गांना लागून असलेल्या जमिनी, प्रमुख औद्योगिक प्रकल्प, कमर्शियल दुकाने, बंगले आणि व्हीआयपी भागांकडे आपला मोर्चा वळवला आहे. सोबतच सरकारी जमिनींचे मोजमाप करण्याचे आदेशही संबंधित विभागांना दिले आहेत.
आयकर विभागासोबत अन्य काही विभागांची मदत घेऊन २०० पेक्षा जास्त पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके अशा सर्व बेहिशेबी मालमत्तांची छाननी करीत असून, त्याचा अहवाल आल्यानंतर सरकार यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईत दोषी आढळून येणार्‍यांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असून, अशा लोकांची बेहिशेबी संपत्ती देखील जप्त केली जाऊ शकते. तसेच त्यांना सात वर्षांचा कारावासही होऊ शकतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Nov 19 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google