Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » आता लक्ष्य स्विस बँकेतील काळ्या पैशावर

आता लक्ष्य स्विस बँकेतील काळ्या पैशावर

=माहिती घेण्यासाठी केंद्राने पाठवली २० पत्रे=
वृत्तसंस्था
बर्न/नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर –
swissaccounts1भारतातील काळा पैसाधारकांना जोरदार दणका दिल्यानंतर केंद्र सरकारने आता स्विस बँकेत जमा असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशावर लक्ष केंद्रीत केले आहे. अशा सर्वच भारतीयांची माहिती प्राप्त करण्यासाठी सरकारने स्वित्झर्लंडमधील काही बड्या व्यक्ती व संस्थांना तब्बल २० विनंती पत्रे पाठवली आहेत.
भारत सरकारने स्वित्झर्लंडमधील ज्या व्यक्ती आणि संस्थांसोबत हा पत्रव्यवहार केला आहे, त्यात रियल इस्टेट क्षेत्रातील एका बड्या कंपनीचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, दिल्लीतील माजी भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍याची पत्नी, दुबईतील अनिवासी भारतीय बँकर, भारतातून पत्नीसह फरार झालेला उच्चपदस्थ अधिकारी आणि संयुक्त अरब अमिरातमधील एका भारतीयाच्या कंपनीचा समावेश आहे. याशिवाय, व्यापारानिमित्त स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झालेल्या गुजरातमधील काही व्यावसायिकांचाही यात समावेश आहे.
यातील बहुतेकांची स्विस बँकेत खाती असून, या बँकेत काळा पैसा जमा करणार्‍या इतर भारतीयांची माहिती त्यांना आहे. त्यामुळे याच लोकांकडून याबाबत सविस्तर माहिती प्राप्त करण्याचा पर्याय सरकारने निवडला आहे.
प्रशासकीय सहकार्याच्या स्वरूपात विनंती करण्यात आल्यास, त्या देशातील सरकारही यात मदत करीत असते आणि तेथील बँकांमध्ये काळा पैसा जमा करणार्‍या व्यक्तींची नावे आणि अन्य माहिती पुराव्यांसह सादर करीत असते. यासाठी स्विस प्रशासनाला फेडरल राजपत्राचा वापर करावा लागणार आहे.
स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांची माहिती देणार्‍या करारावर भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये गेल्या आठवड्यात करार झाला आहे. तथापि, हा करार पुढील वर्षी सप्टेंबरपासून अंमलात येणार असल्याने द्विपक्षीय करविषयक कराराच्या माध्यमातून खातेदारांची माहिती प्राप्त करण्यावर भारत सरकारने भर दिला आहे.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google