Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » आता हजार रुपयांची नवी नोट!

आता हजार रुपयांची नवी नोट!

=नवे रूप-वेगळा रंग=
new-1000rs-noteनवी दिल्ली, [१० नोव्हेंबर] – पाचशे आणि २ हजार रुपयांच्या नव्या नोटांनंतर आता हजार रुपयांची नवी नोटही चलनात येणार आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत अर्थ मंत्रालयाचे सचिव शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली आहे.
येत्या काही महिन्यात नव्या सुरक्षा मानकांसह एक हजार रुपयांची नोट चलनात येणार आहे. या नोटेचे रूपरंग आणि आकार पहिल्या नोटेहून पूर्णतः वेगळे असणार आहे. तसेच येत्या काळात सर्वच नोटा या नव्या स्वरूपात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे सर्वच नोटा या आता वेगळ्या रंगात येत्या काही काळात पाहायला मिळणार आहे.
नोटा बदलून देण्यासाठी बँका सज्ज झाल्या असून आर्थिक व्यवहार करण्यात अडचण जाणवू नये म्हणून  शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बँका सुरू ठेवण्यात येणार  आहेत. बँकेत एका वेळी चार हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.
बुधवारी बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज गुरुवारी सकाळपासून नोटा बदलण्यासाठी तसेच पैसे जमा करण्यासाठी बँका आणि पोस्ट ऑफिसबाहेर  गर्दी होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बँकांबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयात सरकारचे कॅव्हेट
५०० आणि हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला विविध याचिकांद्वारे न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय या प्रकरणी सुनावणी करण्यात येऊ नये, या हेतुने केंद्र सरकारने हा कॅव्हेट दाखल केला आहे. या प्रकरणी १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात येऊ शकतेे. दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयाने सरकारविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. ५०० आणि हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय देशहिताचा असल्याचे नमूद करून न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

शेअर करा

Posted by on Nov 11 2016. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google