Home » ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य » आयुर्वेदिक औषधींमध्ये अल्कोहोल वापरावरील बंदी रद्द

आयुर्वेदिक औषधींमध्ये अल्कोहोल वापरावरील बंदी रद्द

=उच्च न्यायालयाकडून औषध निर्मात्यांना दिलासा=
patna-high-courtपाटणा, [२७ ऑक्टोबर] – आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांच्या निर्मितीमध्ये अल्कोहोलचा वापर करण्यावर बिहार सरकारने घातलेल्या बंदीचा आदेश उच्च न्यायालायने रद्द करण्याचे आदेश दिले.
बिहार सरकारने १७ मार्च २०१६ रोजी एका अध्यादेशाद्वारे परवानाधारक आयुर्वेदिक व होमियोपॅथिक औषधांची निर्मिती करण्यासाठी अल्कोहोलचा वापर करण्यास बंदी घातली होती. हा अध्यादेश १ एप्रिल २०१६ पासून लागू होईल. राज्य सरकारच्या या अध्यादेशाला आव्हान देणार्‍या दोन याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. मुख्य न्यायमूर्ती इक्बाल अहमद अन्सारी व न्या. समरेंद्र प्रताप सिंग यांच्या खंडपीठाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर उपरोक्त आदेश दिला.
परवानाधारक कंपन्यांना पर्यायी औषध निर्मितीसाठी अल्कोहोलचा वापर न करण्यास बंदी घालण्याचा आदेश काढण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही, असे सम्राट केमिकल इंडस्ट्री व श्री बैद्यनाथ आयर्वेद भवन प्रा. लि.ने आपल्या याचिकेत म्हटले आहे. अल्कोहोलचा कुठल्याही तर्‍हेने गैरवापर होण्याची शक्यता नसताना कोणत्याही परवानाधारक औेषध निर्मात्या कंपन्यांना अल्कोहोल वापरावर बंदी घालू शकत नाही आणि औषध निर्मिती करणार्‍या अशा कंपन्यांचा परवाना रद्द करण्याचा अधिकारसुद्धा राज्य सरकारला नाही. हा अधिकार केंद्र सरकारला आहे, असे कंपन्यांची बाजू मांडणारे वकील सत्यबीर भारती व ऍड. आलोक चंद्रा यांनी न्यायालयाला सांगितले. परवाना रद्द करून राज्य सरकार व्यापार व व्यवसायाचा अधिकार हिरावून घेत आहे, असे ते बाजू मांडताना म्हणाले.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google