Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आसाम, मध्यप्रदेशात भाजपाचा मोठा विजय

आसाम, मध्यप्रदेशात भाजपाचा मोठा विजय

♦लोकसभा, विधानसभेची पोटनिवडणूक
♦बंगालमधील तिन जागा तृणमूलकडे,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर
India Electionsसहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीत घेण्यात आलेल्या लोकसभा आणि विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपा आणि तृणमूल कॉंगे्रसने मोठा विजय मिळवला आहे. आसाम आणि मध्यप्रदेशातील लोकसभेची जागा भाजपाने स्वत:कडे कायम राखली आहे. नोटाबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर खुश होऊनच नागरिकांनी भाजपाच्या बाजूने कौल दिला असल्याचे हे स्पष्ट संकेतच आहेत.
सर्वानंद सोनोवाल यांनी आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी या राज्यातील लखिमपूर लोकसभा जागेचा राजीनामा दिला होता. भाजपाचे उमेदवार प्रधान बारुआ यांनी कॉंगे्रसच्या हेमा प्रसंगा पेगू यांचा सुमारे १ लाख ९० हजार २१९ मतांनी दारुण पराभव केला. सोबतच, बैठालांगसो विधानसभेची जागाही भाजपाने जिंकली आहे. पक्षाचे उमेदवार मानसिंग रोंगपी यांनी कॉंगे्रसचे रूपोनसिंग रोंगहांग यांचा १६,६०० मतांनी पराभव केला.
मध्य प्रदेशातही शाहडोल लोकसभा आणि नेपानगर विधानसभेची जागा भाजपाने स्वत:कडे कायम ठेवली आहे. शाहडोल जागेवर भाजपाचे ग्यान सिंग यांनी कॉंगे्रसच्या उमेदवाराला ६० हजार मतांनी पराभव केला. या पोटनिवडणुकीत ग्यान सिंग य ांना ४,८१,३९८ मते मिळाली. नेपानगर विधानसभा क्षेत्रात भाजपाचे मंजू दादू यांनी कॉंगे्रसचे उमेदवार अंतर सिंग बरडे यांचा ४२,१९८ मतांनी पराभव केला.
बंगालमधील लोकसभेच्या दोन व विधानसभेची एक जागा सत्तारूढ तृणमूल कॉंगे्रसने जिंकली आहे. तामलूक, कूचबेहार असे लोकसभा मतदारसंघ आणि मोंटेश्‍वर विधानसभा मतदारसंघात या पक्षाने विजय मिळवला आहे.
अरुणाचल प्रदेशच्या हलुलियांग विधानसभेची जागा भाजपाप्रणीत आघाडीचे उमेदवार दासांगलू पूल यांनी जिंकली आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार योम्पी क्री यांचा ९४२ मतांनी पराभव केला.
तामिळनाडूत सत्तारूढ अण्णाद्रमुकने विधानसभेच्या सर्व तिन्ही जागा जिंकल्या आहेत. यातील अरावक्कुर्चीची जागा खेचून आणताना तंजावूर आणि थिरुपरनकुंद्रम् या दोन जागा स्वत:कडे कायम ठेवल्या आहेत. सध्या अपोलो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री जयललिता यांनी या विजयासाठी मतदारांचे आभार मानले आहे.
त्रिपुरातील बारजाला मतदारसंघात माकपचे उमेदवार झुमू सरकार यांनी भाजपाचे उमेदवार शिस्तमोहन दास यांचा पराभव केला.
पुडुचेरी येथील नेलिथोपे विधानसभेच्या जागेवर कॉंगे्रसचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी अण्णाद्रमुकच्या उमेदवाराचा पराभव केला.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google