Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » इम्रानने दिले शरीफांविरोधात पुरावे

इम्रानने दिले शरीफांविरोधात पुरावे

=पनामा पेपर्स=
वृत्तसंस्था
imran-khan-nawaz-sharifइस्लामाबाद, १४ नोव्हेंबर –
पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी १९८८ पासून कर बुडवून १४५ दशलक्ष रुपयांचा घोटाळा केला आहे, हा लीक झालेल्या पनामा दस्तावेजातील आरोप सिद्ध करणारे ठोस पुरावे पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पार्टीचा नेता इम्रान खानने आज सर्वोच्च न्यायालयात सादर केले.
शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे असलेली संपत्ती तसेच त्यांच्यावरील कर्ज माफीच्या योजनांचे दस्तावेज इम्रानने न्यायालयाला दिले. कर बुडविण्यासाठी शरीफ व त्यांचे कुटुंबीय १९८८ पासूनच हुंडी आणि हवाला यासारख्या व्यवसायात सामील आहेत, असे वृत्त डॉन या दैनिकाने दस्तावेजांच्या हवाल्याने प्रकाशित केले आहे. १४५ दशलक्ष रुपयांच्या घोटाळ्याच्या काळात शरीफ यांनी केवळ ८९७ रुपयेच कर स्वरूपात जमा केले आहेत, असा दावाही या दस्तावेजांमधून करण्यात आला आहे.
नवाझ शरीफांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी पेशावर येथील दोन हवाला व्यावसायिक त्यांचा पैसा विदेशात नेत होते. संयुक्त अरब अमिरात आणि अन्य देशांमधील बँकांमध्ये तो जमा करून विदेशी चलनाच्या स्वरूपात तो शरीफ यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे पुन्हा पाकिस्तानात आणला जात होता, असेही यात नमूद आहे.

शेअर करा

Posted by on Nov 15 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google