Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » इराकी फौजांच्या हल्ल्यात २०० वर अतिरेकी ठार

इराकी फौजांच्या हल्ल्यात २०० वर अतिरेकी ठार

=महिलांच्या वेशात पळताहेत इसिसचे सदस्य=
iraq-army-attacks-isisमोसूल, [२१ ऑक्टोबर] – इराकमधून इसिस या अतिशय कू्रर संघटनेच्या दहशतवाद्यांना पिटाळून लावण्यासाठी इराकी फौजांनी सुरू केलेली कारवाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. मोसूलच्या पूर्वेकडील नावरान शहर ताब्यात घेत सैनिकांनी या आरपारच्या लढाईत २०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. आपला जीव वाचविण्यासाठी अतिरेकी चक्क बायकांच्या वेशात पळ काढत आहेत.
धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेला मोसूल पांत इसिसच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी इराकी फौजांनी मंगळवारी आक्रमण केले होते. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून पहिले दोन दिवस सावध पावित्रा घेतल्यानंतर सैनिकांनी आता जोरदार चढाई सुरू केली आहे. इराकी फौजांना कुर्दिश आणि युरोपीयन फौजांचेही समर्थन प्राप्त आहे. या सर्व फौजांनी इसिसला चहूबाजूंनी वेढले असून, आता आपला टिकाव लागणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर इसिसचा म्होरक्या अबु बकर अल् बगदादीने आपल्या अतिरेक्यांना महिलांच्या वेशात पळ काढण्याचे आदेश दिले आहेत. कुर्दिश लष्कराने महिलांच्या वेशातील काही अतिरेक्यांना पकडले असून, यात इसिसच्या काही कमांडर्सचाही समावेश आहे. बगदादी हा देखील मोसूलमध्येच कुठेतरी लपून बसला असल्याची माहिती आहे.
इसिसच्या अतिरेक्यांची दाणादाण उडाली आहे. लढाई आता निर्णायक टप्प्यात आहे. आतापर्यंत अपेक्षेपेक्षाही जास्त यश मिळ आले आहे, अशी माहिती इराकचे पंतप्रधान हैदर अल् अबादी यांनी पॅरीस येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय बैठकीत बोलताना दिली.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google